मारुती सुझुकी इको ही कार व्यावसायिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तसेच ही देशातली सर्वात स्वस्त ७ आणि ८ सीटर कार आहे. त्यामुळेच दर महिन्याला या कारच्या १० हजारांहून अधिक युनिट्सची विक्री होते. परंतु ही कार फारशी चर्चेत नसते. कारण इतर हॅचबॅक, सेडान, एमपीव्ही, एसयूव्ही आणि प्रीमियम कार्सचीच जास्त चर्चा होते. परंतु मारुती इको ही कार भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. मारुती सुझुकीने गेल्या महिन्यात ईकोच्या १,१२७ युनिट्सची भारताबाहेर निर्यात केली आहे. ही संख्या फार मोठी वाटत नसली तरी या कारच्या वार्षिक निर्यातीत (YoY एक्सपोर्ट ग्रोथ) मोठी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात म्हणजेच मे २०२२ मध्ये मारुती सुझुकीच्या ईको या कारच्या केवळ २३ युनिट्सची निर्यात झाली होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या कारच्या निर्यातीत तब्बल १,१०४ युनिट्सची वाढ झाली आहे. याचाच अर्थ या कारच्या विक्रीत तब्बल ४८०० टक्के वाढ झाली आहे. या कारचं पेट्रोल मॉडेल १९.१ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देण्यास सक्षम आहे. तर ही कार सीएनजीवर २६.७८ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. ही कार मल्टी सीट आणि कमर्शियल व्हेरिएंटमध्ये विकली जाते.
मारुती सुझुकी ईको या कारमध्ये के सिरीज १.२ लीटर इंजिन देण्यात आलं आहे. नवीन ईको कार एकूण १३ व्हेरिएंट्समध्ये येते. यात ५ सीटर, ७ सीटर, टूर आणि अँब्युलन्स बॉडी स्टाईलचा समावेश आहे. या कारचं इंजिन ८०.७६ पीएस पॉवर आणि १०४.५ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. सीएनजीवर ही कार ७१.६५ पीएस पॉवर आणि ९५ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते.
हे ही वाचा >> ४.२ लाखाच्या कारसमोर सर्व पडल्या फिक्या, देशातच नव्हे तर परदेशातही उडवली खळबळ, होतेय धडाधड विक्री
मारुती ईकोमध्ये मिळतात अनेक सेफ्टी फीचर्स
या कारमध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, इंजिन इमोबिलायझर, दरवाजांसाठी चाइल्ड लॉक, सीट बेल्ट रिमाइंडर, ईबीडीसह एबीएस, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.