सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत. आपल्या ग्राहकांसाठी कंपन्या अनेक नवनवीन मॉडेल्स सादर करत असतात. तसेच प्रत्येक कंपनी प्रत्येक महिन्याला आपल्या विक्रीचा रिपोर्ट सादर करत असते. जुलै २०२३ मध्ये पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये फ्लॅट वाढ दिसून येईल. जुलै महिन्यात चार कार कंपनीने महिन्या-दर-महिना (MoM) मध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली. काही वाहन कंपन्यांनी त्यांचा बाजारातील हिस्सा राखून ठेवला. तर काही कंपन्यांची घसरण झाली. जुलै २०२३ मध्ये भारतीय बाजारपेठेतील टॉप ५ अशा सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार ब्रँड्सवर एक नजर टाकणार आहोत.

Maruti Suzuki

देशातील सर्वात मोठी कार कंपनी असणाऱ्या मारुती सुझुकीने गेल्या महिन्यात तब्बल १,५२,१२६ युनिट्सची विक्री करून भारतीय कार बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम राखले. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत ६ टक्के वाढ झाली आहे तर बाजारातील हिस्सा १.४ टक्क्यांनी वाढला आहे. जून २०२३ मध्ये मारुतीने १,३३,०२७ युनिट्सची विक्री केली ज्यामुळे कंपनीचा MoM १४.४ टक्क्यांनी वाढला आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
loss firms donate electoral bonds
तोट्यात असणाऱ्या ३३ कंपन्यांकडून ५४२ कोटी रुपयांचे रोखे दान, एकट्या भाजपाला मिळाले तब्बल…

हेही वाचा : अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले,Tata ने नव्या अवतारामध्ये लॉन्च केली ‘ही’ कार; किंमत फक्त…

Hyundai

जुलै २०२३ ह्युंदाई कंपनीने एकूण ५०,७०१ युनिट्सची विक्री केली असून. यादीमध्ये ह्युंदाई दुसऱ्या स्थानावर आहे. मागील महिन्याच्या तुलनेत ही वाढ १.४ टक्क्यांवर स्थिर राहिली. गेल्या वर्षी याच महिन्यात कोरियन कंपनी असलेल्या ह्युंदाईने ५०,५०० युनिट्सची विक्री केली. ज्यामुळे ०.४ अशी किरकोळ वार्षिक वाढ झाली. मात्र कंपनीचा बाजारातील हिस्सा ०.४ टक्क्यांनी घसरला.

Tata Motors

मागील वर्षी म्हणजेच जुलै २०२२ मध्ये टाटा मोटर्सने आपल्या ४७,५०६ युनिट्सची विक्रिकेली. तर या वर्षी कंपनीने ४७,६३० युनिट्सची विक्री केली. या आकडेवारीनुसार कंपनीने आपले पीव्ही सेगमेंटमधील तिसरे स्थान कायम राखले. जूनमध्ये ही आकडेवारी ४७,२४० युनिट्स इतकी होती. ह्युंदाईप्रमाणेच टाटा मोटर्सच्या बाजार हिस्सा देखील ०.४ टक्क्यांनी घसरला.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 5 August: कच्चा तेलाच्या किमतीमध्ये घसरण, वाचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

Mahindra

जुलै २०२३ च्या पीव्ही सेगमेंटमध्ये चौथ्या स्थानावर महिंद्रा कंपनी आहे. जिने सर्वात जास्त युनिट्सची विक्रिकेली आहे. जुलै २०२३ मध्ये कंपनीने सर्वाधिक ३० टक्के वार्षिक वाढ नोंदवली. कारण स्वदेश कार निर्मात्या कंपनीने यावेळेस ३६,२०१ युनिट्सची विक्री केली. जी देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वात जास्त मासिक विक्री संख्या आहे. परिणामी पीव्ही सेगमेंटमध्ये महिंद्रा कंपनीचा बाजारातील हिस्सा २.१ टक्क्यांनी एकला. जून २०२३ मधेय कंपनीने ३२,५८५ युनिट्सची विक्री केली.

car sales july 2023
image credit-financial Express

Toyota

टोयोटा कंपनीने जुलै २०२३ मध्ये २०,७५९ युनिट्सची विक्री केली. तसेच इतक्या युनिट्सची विक्री करून टोयोटाने किआला पाचव्या स्थानावरून हटवले. मागील वर्षी याच महिन्यात जपानी वाहन निर्मात्याने १९,६९३ युनिट्सची विक्री केली. कंपनीने ५.४ टक्के वार्षिक वाढ नोंदवली. हायरायडर आणि इनोव्हा हायक्रॉस सारख्या नवीन मॉडेलच्या एन्ट्रीमुळेच हे शक्य झाले आहे.