scorecardresearch

Maruti Suzuki चा नववर्षाचा धमाका! Alto ते Eecoपासून ‘या’ ८ कारवर बंपर सूट; पाहा कोणत्या कारवर मिळतेय किती सूट?

Maruti Suzuki January Discount: मारुती सुझुकी ‘या’ जानेवारी महिन्यात वाहनप्रेमींसाठी बंपर डिस्काउंट ऑफर घेऊन आलीये.

Maruti Suzuki चा नववर्षाचा धमाका! Alto ते Eecoपासून ‘या’ ८ कारवर बंपर सूट; पाहा कोणत्या कारवर मिळतेय किती सूट?
मारुती सुझुकीच्या 'या' कारवर मोठी सवलत. (Photo-financial express)

Maruti Suzuki January Discount: Tata Motors आणि Renault India नंतर, Maruti Suzuki ने देखील वर्ष २०२३ची पहिली डिस्काउंट ऑफर जारी केली आहे, ज्यामध्ये कंपनी निवडक कारवर ३८,००० रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. ज्या गाड्यांवर मारुती ही सूट देत आहे त्यात मारुती अल्टो K10 (Maruti Alto K10), मारुती एस प्रेसो (Maruti S Presso), मारुती वॅगन आर (Maruti Wagon R), मारुती सेलेरियो (Maruti Celerio),  मारुती अल्टो 800 (Maruti Alto 800), यांचा समावेश आहे. मारुती डिझायर (maruti Dzire) आणि मारुती स्विफ्ट (Maruti Swift)च्या नावांचा समावेश आहे.

Maruti Suzuki जानेवारी 2023 डिस्काउंट

मारुती सुझुकी जानेवारी २०२३ डिस्काउंटमध्ये आपल्या कारवर देत असलेल्या सवलतींमध्ये एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटसह रोख सवलत समाविष्ट आहे. मारुतीची ही सवलत ऑफर केवळ ३१ जानेवारी २०२३ पर्यंत वैध आहे. जर तुम्ही मारुती सुझुकीची यापैकी कोणतीही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर येथे जाणून घ्या की कोणती कार खरेदी केल्याने तुम्हाला किती फायदा होऊ शकतो.

Maruti Suzuki Alto 800
मारुती अल्टो ही देशातील सर्वात कमी किमतीची एंट्री लेव्हल हॅचबॅक आहे, जी जानेवारीमध्ये खरेदी केल्यावर कंपनी ३१,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही सूट त्याच्या टॉप व्हेरियंट आणि सीएनजी व्हेरियंटवर उपलब्ध असेल. जर तुम्ही बेस मॉडेल खरेदी केले तर कंपनी ११,००० रुपयांची सूट देत आहे.

(हे ही वाचा : Tata Motors चा नववर्षाचा धमाका! ‘या’ कारवर मिळतेय बंपर सूट; लाभ घेण्याची मोठी संधी )

Maruti Suzuki Alto K10

Maruti Alto K10 ही एक लोकप्रिय हॅचबॅक आहे जी कंपनीने अलीकडेच नवीन अवतारासह लाँच केली आहे. कंपनी जानेवारीमध्ये या कारवर ३८,००० रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. Alto K10 चे CNG वेरिएंट विकत घेतल्यावर कंपनी ३८,००० रुपयांची सूट देत आहे. या सवलतीमध्ये १५,००० रुपयांची रोख सवलत, १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ८,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.

Maruti Suzuki Maruti Celerio
मारुती सेलेरियोला कंपनीने अद्ययावत इंजिन, फीचर्स आणि डिझाइनसह पुन्हा लाँच केले आहे, ज्यावर जानेवारीमध्ये २१ ते ३१ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. कंपनी मारुती सेलेरियोच्या मॅन्युअल वेरिएंटवर ३१,००० रुपये, ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर २१,००० रुपये आणि CNG व्हेरिएंटवर ३०,१०० रुपये सूट देत आहे.

Maruti Suzuki Wagon R
Maruti WagonR ही त्याच्या कंपनीची तसेच त्याच्या विभागातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे, जी जानेवारीमध्ये खरेदी केल्यास ग्राहकांना ३३,००० रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. WagonR वर उपलब्ध असलेल्या सवलतीमध्ये १०,००० रुपयांची रोख सवलत, १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ८,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. WagonR चे CNG व्हेरियंट विकत घेतल्यावर कंपनीला ३१,१०० रुपयांची सूट मिळेल.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: लवकरच बदलणार तुमची कार चालवण्याची पद्धत ‘ही’ कंपनी देशात सादर तंत्रज्ञानाने सुसज्ज कार )

Maruti Suzuki Maruti Swift
मारुती स्विफ्ट ही स्पोर्टी डिझाईन असलेली प्रीमियम हॅचबॅक आहे, ज्यावर कंपनी २७ हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. ज्यामध्ये १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस, ७,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि ५,००० रुपयांची रोख सूट दिली जात आहे. याशिवाय कंपनी मारुती स्विफ्टच्या CNG व्हेरियंटवर १०,१०० रुपयांची सूट देत आहे.

Maruti Suzuki S Presso

मारुती सुझुकी ही एकमेव मायक्रो एसयूव्ही आहे ज्यावर जानेवारीमध्ये ३६,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या सवलतीमध्ये १५,००० रुपयांची रोख सवलत, १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ६,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. जर तुम्ही या कारचे ऑटोमॅटिक वेरिएंट विकत घेतले तर कंपनी २१,००० रुपये आणि CNG व्हेरिएंटवर ३५,१०० रुपयांपर्यंत सूट देत आहे.

Maruti Suzuki Dzire
कंपनी मारुती डिझायरवर १७,००० रुपयांची सूट देत आहे, जी त्याच्या सर्व प्रकारांवर लागू होईल. १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ७,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट या सवलतीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

Maruti Suzuki Eeco
Maruti Eeco ही त्याच्या सेगमेंटमधील सर्वात कमी किमतीची कार आहे, ज्यावर मारुती सुझुकी जानेवारीमध्ये १५ ते २५ हजार रुपयांची सूट देत आहे. ज्यामध्ये मारुती ईको कार्गोवर २५,१०० रुपये आणि मारुती ईको सीएनजीवर १५,१०० रुपयांचा फायदा उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 14:08 IST

संबंधित बातम्या