मारुती सुझुकी देशातील आघाडीची ऑटो कंपनी आहे. आता एका चुकीमुळे कंपनीने जवळपास २० हजार गाड्या परत मागवल्या आहेत. कंपनीने सांगितले की, व्हील रिम आकाराचे चुकीचे मार्किंग दुरुस्त करण्यासाठी बाजारातून EECO गाडीचे १९,७३१ युनिट्स परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, १९ जुलै २०२१ ते ५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान उत्पादित केलेल्या काही EECO वाहनांवर व्हील रिम आकार चुकीच्या पद्धतीने चिन्हांकित केल्याचे नियमित तपासणीदरम्यान आढळले आहे. ही चूक दुरुस्तीसाठी काही गाड्या परत मागवल्या आहेत. मारुतीचे ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर त्यांच्या वाहनाचा चेसिस क्रमांक टाकून त्यांच्या वाहनात या संदर्भात काही सुधारणा आवश्यक आहेत का ते तपासू शकतात. कंपनीचे EECO व्हॅन ग्राहक कंपनीच्या http://www.marutisuzuki.com वेबसाइटवर Imp Customer Info भेट देऊ शकतात आणि त्यांच्या वाहनात चुकीचं काही आहे का? पाहू शकतात. तपासण्यासाठी वाहनाचा चेसिस क्रमांक भरावा लागेल. वाहनाच्या आयडी प्लेटवर चेसिस नंबर एम्बॉस्ड केलेला असतो आणि वाहन चलन/नोंदणी कागदपत्रांमध्ये देखील नमूद केलेला असतो.

Tata Concept Curvv इलेक्ट्रिक एसयूव्हीचं टीझर लाँच, जाणून घ्या काय असू शकतात वैशिष्ट्ये

वाढत्या उत्पादन खर्चामुळे मारुती सुझुकी इंडिया या महिन्यात आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. मारुती सुझुकीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनीच्या वाहनांच्या किमती गेल्या एक वर्षापासून सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे कंपनीला किमतीत वाढ करून काही बोजा ग्राहकांवर टाकावा लागेल, असे ते म्हणाले. कंपनी एप्रिलमध्ये वाहनांच्या किमती वाढवणार असून वेगवेगळ्या मॉडेल्ससाठी दरवाढ वेगवेगळी असेल. किमती किती वाढवल्या जातील याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.