Car Finance Plan: प्रीमियम हॅचबॅक कारमध्ये अनेक कंपन्यांच्या वाहनांचा समावेश आहे ज्या त्यांच्या डिझाईन, मायलेज आणि फीचर्ससाठी ग्राहक पसंत करतात. आज आपण Maruti Suzuki च्या Swift या गाडीबद्दल जाणून घेणार आहोत. ही गाडी सुद्धा तिच्या फीचर्स, किंमत आणि मायलेज व स्पोर्टी डिझाईन लुक यामुळे ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.

जर का तुम्हाला स्पोर्टी डिझाईन लुक असणारी मारुती स्विफ्ट आवडत असेल आणि तुम्ही ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आपण ती गाडी कशी खरेदी करता येईल यासाठीचा संपूर्ण फायनान्स प्लॅन जाणून घेणार आहोत.

layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

हेही वाचा : Maruti Suzuki Cars: मारूती सुझुकीच्या ‘या’ तीन वाहनांचा ग्राहकांच्या मनावर दबदबा; जाणून घ्या

मारुती स्विफ्ट LXI मॉडेल हे या सेगमेंटमधील बेस मॉडेल आहे. याची किंमत ही ५,९९, ४५० (एक्स-शोरूम, दिल्ली )रुपये इतकी आहे. तर व रोड या गाडीची किंमत ही ६,५९, २८५ इतकी आहे. जर का तुम्हाला ही गाडी खरेदी करायची आहे पण तुमच्याकडे ५.५९ लाख रुपयांचे बजेट नसेल तर खाली दिलेला फायनान्स प्लॅन वाचून तुम्ही गाडी केवळ ४६ हजार रुपयांच्या डाऊन पेमेंट भरून खरेदी करू शकता.

काय आहे फायनान्स प्लॅन ?

जर का तुम्हाला मारुती स्विफ्टचे हे बेस मॉडेल खरेइड करायचे आहे तर तुम्ही ४६ हजार रुपयांच्या डाऊन पेमेंटमध्ये खरेदी करू शकता. म्हणजेच तुमचे बजेट जर ४६,००० रुपये असेल आणि प्रत्येक महिन्याला EMI भरण्यास सक्षम असाल तर, डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार बँक तुम्हाला ५,९३, २८५ रुपयांचे कर्ज ९.८ टक्के व्याजदराने देऊ शकते. मारुती स्विफ्टच्या बेस मॉडेलवर कर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला ४६,००० रुपयांचे डाऊन पेमेंट करावे वागणार आहे. त्यानंतर बँकेच्या नियमानुसार ५ वर्षांसाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला १२,५४७ रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. या गाडीचा फायनान्स प्लॅन जाणून घेतल्यानंतर आता या गाडीचे फीचर्स देखील जाणून घेऊयात.

मारुती स्विफ्ट – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

काय आहेत फिचर्स

मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये Android Auto आणि Apple CarPlay च्या कनेक्टिव्हिटीसह ७ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मल्टी-फंक्शन स्टिअरिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टीम, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम पुढील भागात देण्यात आली आहे. तसेच एअरबॅग आणि सिट्वर्ति ड्युअल एअरबॅग अशी सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आली आहेत. Maruti Swift मध्ये ११९७ सीसीचे इंजिन देण्यात आले असून जे ८८.५० बीएचपी ची पॉवर आणि ११३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एक लिटर पेट्रोलवर २३.२ किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज देते.

महत्वाची टीप : वर दिलेल्या माहितीच्या आधारे गाडी खरेदी करत असताना पूर्ण चौकशी करूनच कोणताही आर्थिक व्यवहार करावा.