मित्सुबिशीने चीनमधील ऑटो ग्वांगझू येथे नवी इलेक्ट्रिक एअरट्रेक गाडी सादर केली. ई-क्रूझिंग एसयूव्हीच्या संकल्पनेवर आधारित नवीन इलेक्ट्रिक वाहन विकसित करण्यात आल्याचे ऑटोमेकरने सांगितलं आहे. त्यामुळे नव्या इलेक्ट्रिक एसयूव्हीबद्दल कारप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. मित्सुबिशीची डिझाईन खास करून कारप्रेमींच्या पसंतीला उतरते. डायनामिक शील्ड फ्रंट फेसपासून टेलगेटपर्यंत षटकोनी आकारात आकर्षक दिसते.

नव्या मित्सुबिशी एअरट्रेकमध्ये मोठ्या क्षमतेची ७० किलोवॅट ड्राईव्ह बॅटरी लावण्यात आली आहे. त्यामुळे बॅटरी पूर्ण चार्जिंग केल्यानंतर ५२० किलोमीटर धावते, असा दावा कंपनीने केला आहे. बॅटरी गाडीच्या मध्यभागी बसवण्यात आली आहे. मोटर, इन्व्हर्टर आणि रिडक्शन ड्राइव्ह एकाच हलक्या वजनाच्या, कॉम्पॅक्ट युनिटमध्ये एकत्रित केले आहेत. ड्रायव्हिंग सिस्टमसह जोडले गेले आहेत. त्यामुळे गाडीची धावण्याची क्षमता वाढते. तसेच टॉर्क देण्यास सक्षम होते, असा दावा कंपनीने केला आहे. मात्र अद्याप याबाबती आकडेवारी जाहीर केलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इलेक्ट्रिक वाहनाचा आतील भाग मोकळा आणि मोठा ठेवण्यात आला आहे. त्यात हॉरिजॉन्टर थीमवर इन्स्ट्रुमेंट पॅनेल आहे. यामुळे गाडीत बसल्यानंतर प्रशस्त असल्याची अनुभूती येते. तसेच गाडी चालवणाऱ्याला सोपं जातं. तसेच प्रवाशांच्या जिथे जिथे स्पर्श होतो तिथे सॉफ्ट पॅडिंगचा वापर केला गेला आहे. ही इलेक्ट्रिक कार सुमारे २८३० मिमीच्या लांब व्हीलबेससह येते. “आम्हाला आशा आहे की, नवीन एअरट्रेक चीनमधील ग्राहकांची पसंतीस उतरेल. पर्यावरणासाठी नवीन उपक्रम लोकांना जास्त आकर्षित करत आहे. इलेक्ट्रिक वाहनाची मागणी वाढेल.”, असं मित्सुबिशी मोटर्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ताकाओ काटो यांनी सांगितलं. ब्रँडने नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीला एअरट्रेक असे नाव दिले आहे. ग्राहकांना त्यात साहसी राइडचा आनंद घेता येईल, म्हणून हे नाव देण्यात आलं आहे.