Cars With ADAS Under Rs 20 Lakh: ADAS (ADAS- Advanced Driver Assistance System) भारतात येणारी कार खूप लोकप्रिय होत आहे. मात्र, भारतात हे तंत्रज्ञान अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पण, आता हळूहळू कार उत्पादकांनी त्यांच्या नवीन मॉडेल्समध्ये ते सादर करण्यास सुरुवात केली आहे. पण, ADAS असल्यामुळे कारच्या किमतींवर परिणाम होतो, त्यामुळे किंमत वाढते. आज आम्ही तुम्हाला देशातील तीन सर्वात स्वस्त ADAS कारबद्दल सांगणार आहोत.
ADAS सह येणाऱ्या सर्वात परवडणाऱ्या कार
Honda City- V Variants
नवीन 2023 Honda City फेसलिफ्ट ही ADAS वैशिष्ट्यासह भारतातील सर्वात परवडणारी कार बनली आहे. Honda City (V variant) ची किंमत १२.३७ लाख (एक्स-शोरूम) आहे आणि ADAS मिळते. होंडा सिटीचा हा दुसरा बेस व्हेरिएंट आहे. त्याच्या ADAS मध्ये अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन, रोड डिपार्चर मिटिगेशन सिस्टीम आणि ऑटो हाय-बीम यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
Hyundai Verna- SX (O) Variants
Hyundai ने नुकतीच न्यू-जेन Verna लाँच केली आहे, ज्याला SmartSense ADAS तंत्रज्ञान देण्यात आले आहे. त्याच्या SX (O) वेरिएंटला ADAS मिळण्यास सुरुवात होते, किंमत १५.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट कोलिजन अव्हायडन्स असिस्ट, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, स्मार्ट क्रूझ कंट्रोल आणि हाय बीम असिस्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
(हे ही वाचा : नो मायलेजचे टेन्शन! ७ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतील ‘या’ आहेत सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या कार)
MG Astor- Savvy Variants
MG Astor च्या टॉप-स्पेक सॅव्ही प्रकारात ADAS लेव्हल-२ वैशिष्ट्ये आहेत, ज्याची किंमत १६.७९ लाख (एक्स-शोरूम) आहे. MG Astor च्या ADAS सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट यांचा समावेश आहे.