भारतात एसयूव्ही कारची विक्री झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच मारुती सुझुकीपासून टाटा, होंडापर्यंतच्या कंपन्या नव्या एसयूव्ही देशात लाँच करत असतात. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट देशात झपाट्याने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये अनेक नवीन मॉडेल्स कंपन्या सादर करत आहेत. भारतातील SUV सेगमेंटमध्ये झपाट्याने वाढ होत असून तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत कॉम्पॅक्ट एसयूव्ही मिळत आहेत. यातच आता बाजारपेठेत लवकरच नवीन एसयूव्ही दाखल होत आहेत. त्यामुळे नेक्सान, क्रेटा, सफारी आणि स्कॉर्पियो यांचे धाबे दणाणले आहेत.
यापूर्वी ही ५ सीटर एसयूव्ही म्हणून बाजारात आली होती आणि तिला खूप मागणी होती. ही कार तिच्या लुक आणि परफॉर्मन्समुळे लोकांच्या पसंतीस उतरली. पण त्यानंतर कंपनीने आपली नवीन पिढी भारतात सादर केली नाही आणि तिचे उत्पादन येथेच थांबवले. पण पुन्हा एकदा त्याचं नवीन मॉडेल याच महिन्यात लाँच होणार असल्याची माहिती आहे.
आज आम्ही तुम्हाला Renault Duster बद्दल सांगत आहोत. Renault पुन्हा एकदा डस्टरची नवीन पिढी बाजारात आणण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि या महिन्याच्या अखेरीस २९ नोव्हेंबर रोजी डस्टर लाँच होण्याची शक्यता आहे. यासोबतच या कारचे बुकिंगही सुरू होणार असून कंपनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला कारची डिलिव्हरीही सुरू करणार असल्याची माहिती आहे.
(हे ही वाचा : टेस्लाचे धाबे दणाणले! स्मार्टफोन, टीव्ही, घड्याळे बनविल्यानंतर आता ‘ही’ प्रसिध्द कंपनी आणतेय स्वस्त नवी सेडान कार )
नवीन Renault Duster मध्ये काय असेल खास?
आता नवीन डस्टरमध्ये पेट्रोल इंजिन दिले जाणार असून कंपनी त्याचे दोन पर्याय देणार आहे. डस्टरमधील पहिले इंजिन २.० लिटर टर्बो पेट्रोल असेल. हे इंजिन १४० BHP पॉवर जनरेट करेल. कंपनी त्यात हायब्रिड इंजिनही देऊ शकते. हे इंजिन १.२ लिटरचे असेल जे १७० bhp पॉवर जनरेट करेल. या इंजिनसह कारचे मायलेज २५ किलोमीटर प्रति लिटरपेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. तिसरे इंजिन म्हणून तुम्हाला १.३ लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन १७० BHP पॉवर देखील जनरेट करेल.
कंपनीने नव्या डस्टरचे डिझाइन पूर्णपणे बदलले आहे. या नव्या कारला अतिशय बोल्ड डिझाईन देण्यात आले असून आता ती बॉक्सी डिझाईनमध्ये दिसणार आहे. कारमध्ये स्लीक ग्रिल सेक्शन देण्यात आले आहे. समोरील बाजूस Y पॅटर्नमध्ये LED हेडलॅम्प दिलेले आहेत, समोरच्या बंपरच्या दोन्ही बाजूंना एअर इनटेक दिसू शकतात.
नवीन Renault Dusterची किंमत १० लाख ते १५ लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र, आत्तापर्यंत कंपनीने कारच्या किमतींबाबत कोणताही खुलासा केलेला नाही आणि त्याच्या वैशिष्ट्यांबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही, अनेक मिडिया रिपोर्टनुसार ही माहिती देण्यात आलेली आहे.