scorecardresearch

Ola Electric ने ग्राहकांसाठी लाँच केले सब्स्क्रिप्शन्स प्लॅन; जाणून घ्या काय मिळणार सेवा

Ola Eletric ने Ola Care आणि Ola Care+ या स्कीम सुरु केल्या आहेत.

Ola eletric launch 2 supscriptions plan
Ola Eletric – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Ola Electric ने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन सब्स्क्रिप्शन प्लॅन्स लाँच केले आहेत. कंपनीने ओला इलेक्ट्रिक कारच्या मालकांसाठी आफ्टर सेल्स सर्व्हिसनंतरची सेवा देण्यासाठी Ola Care आणि Ola Care+ या स्कीम सुरु केल्या आहेत. ओला केअर सब्स्क्रिप्शन प्लॅनचा एक भाग म्हणून ग्राहकांना मोफत होम सर्व्हिस यासारख्या सेवा मिळणार आहेत. ज्यामध्ये होम पिकअप आणि ड्रॉप अशा सेवा यामध्ये समाविष्ट आहेत.

ओला केअर यामध्ये मोफत श्रम, तसेच रस्त्याच्या कडेला आणि चोरी सहाय्यता हेल्पलाईन अशा सेवा मिळतात. तर ओला केअर प्लस मध्ये मोफत घर सेवा, पिकअप आणि ड्रॉप सेवा , मोफत उपभोग्य वस्तू आणि संपूर्ण वेळ वैद्यकीय मदत या सेवा येतात. ओला केअर प्लस या प्लॅनमध्ये मोफत टॅक्सी राईड, शहराबाहेर ओला इलेक्ट्रिक बंद पडली तर हॉटेलमध्ये मोफत राहण्याची सुविधा मिळते.

हेही वाचा : JK Tyre ने SUV कारसाठी आणली नवीन सिरीज; महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी डिलरशिप केली सुरु

ग्राहक हा केंद्रित ब्रँड असल्याने आमच्यासाठी सेवेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. ओला केअर सबस्क्रिप्शन प्लॅन’ द्वारे, आम्ही ग्राहक सेवेच्या अनुभवाची पूर्णपणे पुनर्कल्पना करत आहोत आणि आमच्या ग्राहकांसाठी विक्रीनंतरची सर्वोत्तम सेवा आणण्याचे आमचे ध्येय आहे असे ओलाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अंशुल खंडेलवाल म्हणाले.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 17:51 IST