JK टायर कंपनीने आपल्या टायरची नवीन सिरीज लाँच केली आहे. जेके तयारीने SUV टायर्सची सिरीज भारतात लाँच केली आहे. ज्याला रेंजर HPe आणि X-AT म्हटले जाते. या टायर्सची सिरीज जेके टायरच्या सध्याच्या रेंजर सिरीजसोबतच विकले जाणार आहेत. भारतात वेगाने SUV वाढणाऱ्या सेगमेंटला पूरक अशी या सिरीजचे डिझाईन करण्यात आले असल्याचा कंपनीचा दावा आहे.
जेके टायरच्या नवीन प्रॉडक्ट्सबद्दल बोलायचे झाल्यास नवीन रेंजर HPE XPolymer3 तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आले आहे. जे अधिक टिकाऊ आहेत. तसेच नवीन जेके टायर हे एक्स-एटी विषम परिस्थितीमध्ये उत्तम स्टिअरिंग स्थिरता प्रदान करण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आले आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.
याशिवाय जेके टायरने महाराष्ट्रात नाशिक, नागपूर, धुळे, लासलगाव आणि मालेगाव या ५ ठिकाणी नवीन डिलरशिप्सचे उदघाटन केले आहे. नवीन डिलरशिप कॉम्प्युटराईस्ड व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि ऑटोमेटेड टायर चेंजिंग या सर्व्हिसेस देणार आहेत.
आमच्या रेंजर या रेंज ला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आम्ही अजून रेंजर एचपीई आणि रेंजर एक्स-एटी या दोन नवीन सिरीज लाँच केल्या आहेत असे जेके टायरचे अध्यक्ष अनुज कथुरिया म्हणाले.