ओला इलेक्ट्रिक लवकरच त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro साठी पहिले मोठे OTA अपडेट आणणार आहे. MoveOS 2 अपडेटच्या काही दिवस आधी, इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्मात्याने याबाबतची माहिती दिली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आणखी एक फिचर्स जोडले जाणार असून भाविश अग्रवाल, संस्थापक आणि सीईओ, ओला इलेक्ट्रिक, यांनी ओला अ‍ॅपचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अपडेट रोल आउट झाल्यानंतर अ‍ॅप लॉक वैशिष्ट्य सक्रिय केले जाईल.

इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro मध्ये आतापर्यंत नवीन सॉफ्टवेअर अपडेट नव्हते. S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झाल्यानंतर हे पहिले मोठे ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट आहे. जोडल्या जाणार्‍या काही वैशिष्ट्यांमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि क्रूझ कंट्रोल वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करताना अग्रवाल यांनी लिहिले की, “आमच्याकडे MoveOS २ साठी ओला इलेक्ट्रिक अ‍ॅप तयार आहे”

ओला इलेक्ट्रिकने नवीन अपडेटमध्ये सक्रिय होणार्‍या सर्व फिचर्सची यादी शेअर केलेली नाही. तथापि, ओला इलेक्ट्रिक ग्राहकांना हिल होल्ड कंट्रोल आणि हायपर मोड सारखी काही प्रमुख फिचर्ससाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.