भारतातल्या सर्व वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ मधील वाहनांच्या विक्रीचा अहवाल सादर केला आहे. त्यावरून एक गोष्ट लक्षात आली आहे की, भारतीय वाहन उद्योग आता रुळावर आला आहे. बहुतांश वाहन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री नोंदवली आहे. तसेच सर्वच सेगमेंटमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. प्रवासी (पॅसेंजर) वाहने, व्यावसायिक (कमर्शियल) वाहने, दुचाकीसह सर्व सेगमेंटमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. सेमीकंडक्टरची कमतरता, कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा असूनही, प्रवासी वाहन विभागाची विक्री चांगली झाली आहे.

प्रवासी वाहनांची ‘इतकी’ झाली विक्री

गेल्या वर्षी ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ मध्ये प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्री २३ टक्क्यांनी वाढून ९,३४,९५५ युनिट झाली. त्याआधीच्या वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये ७,६१,१२४ वाहनांवही विक्री झाली होती. वाहन उत्पादकांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने ही माहिती दिली आहे.

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर

(हे ही वाचा : TaTa Motors च्या ‘या’ दोन लोकप्रिय SUV वर लाखोंची सूट, पाहा टाटाची जबरदस्त ऑफर )

प्रवासी वाहनांनी आतापर्यंतची सर्वाधिक ३८ लाख वाहनांची विक्री नोंदवली आहे. २०१८ मधील मागील उच्च विक्री पातळीपेक्षा हे जवळपास चार लाख वाहनांनी जास्त आहे. तसेच गेल्या वर्षी ९.३ लाख व्यावसायिक वाहनांची विक्री झाली होती.

सियामने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत ७ टक्क्यांनी वाढ झाली आणि ती २,३५,३०९ वाहनांवर गेली आहे. त्याआधीच्या वर्षातील डिसेंबर मध्ये एकूण २,१९, ४२१ वाहनांची विक्री झाली झाली होती. गेल्या वर्षात व्यावसायिक, तीनचाकी आणि दुचाकी यांसारख्या श्रेणींमध्ये घाऊक विक्रीत वाढ झाली आहे.