रॉयल एनफील्डच्या बाईकना भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. तरुणांची या बाईकमध्ये वेगळीच क्रेझ आहे. ही क्रेझ पाहूनच कंपनीने नवी बाईक देशात दाखल केली आहे. कंपनीने Motoverse दरम्यान नवीन बाईक भारतात सादर केली आहे. ही बाईक अधिकृतपणे लाँच करण्यात आलेली नाही. कंपनीने या बाईकचे फक्त २५ युनिट्स तयार केले असून याची लकी ड्रॉद्वारे ग्राहकांमधून निवड केली जाईल, अशी माहिती आहे.
Royal Enfield ची ही बाईक सादर
रॉयल एनफील्डने त्यांची नवी मोटरसायकल Royal Enfield Shotgun 650 बाजारात उतरवली आहे. गोव्यातील वार्षिक रायडर मॅनिया इव्हेंटमध्ये रॉयल एनफील्ड शॉटगन ६५० मोटोव्हर्स एडिशन सादर करण्यात आले आहे. Royal Enfield Shotgun 650च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, यात टर्न इंडिकेटरसह LED हेडलाइट आणि टेल लाईट आहे. याशिवाय बाईकचे इंजिन आणि एक्झॉस्ट मॅट ब्लॅक फिनिशमध्ये ठेवण्यात आले आहे. कंपनीच्या इतर ६५०cc बाइक्सप्रमाणे ही बाईक ड्युअल एक्झॉस्टसह येते. याशिवाय, बाईकच्या पुढील बाजूस अपसाइड डाउन टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग लोडेड सस्पेंशन देण्यात आले आहे. बाईकच्या दोन्ही चाकांवर ड्युअल चॅनल एबीएससह डिस्क ब्रेक आहेत.
Royal Enfield Shotgun 650 बाईकचे वैशिष्टये
बाईकचे स्विच गियर, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक सुपर मेटिअर ६५० प्रमाणे ठेवण्यात आले आहेत. तथापि, कंपनीने या बाईकच्या संपूर्ण वैशिष्ट्यांचा खुलासा केलेला नाही, परंतु कंपनीने त्यात विद्यमान सुपर मेटिअर ६५० चे तेच इंजिन वापरले असावे, अशी अपेक्षा आहे. बाईकमध्ये ६४८cc पॅरलल ट्विन सिलेंडर इंजिन बसवण्यात आले आहे जे ४७ bhp पॉवर आणि ५२ Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक स्लिपर आणि असिस्ट क्लचसह ६ स्पीड गिअरबॉक्समध्ये येते.
(हे ही वाचा : रस्त्यावर बजाजची ‘ही’ स्वस्त बाईक धावणार नाही; खरेदीसाठी व्हायची मोठी गर्दी, आता ग्राहकांकडे कोणता पर्याय? )
Shotgun 650 बद्दल सांगायचे तर, ती कंपनीच्या संकल्पना बाईक SG650 वर आधारित आहे जी २०२१ EICMA मोटरसायकल शो दरम्यान सादर करण्यात आली होती. कंपनी गेल्या तीन वर्षांपासून या बाईकवर काम करत होती आणि या काळात ही बाईक अनेक वेळा रस्त्यांवर चाचणी करताना दिसली आहे.
बाईकची डिलिव्हरी कधी होणार?
कंपनी हँड पेंटेड स्कीममध्ये या बाइक्स सादर करत आहे. माहितीनुसार, या बाइक्सची डिलिव्हरी जानेवारी २०२४ मध्ये सुरू होईल. ही बाईक मूळ स्वरूपात सिंगल सीटवर सादर करण्यात आली आहे, परंतु ग्राहकांना त्यात पिलियन सीट देखील बसवता येईल. याशिवाय कंपनी या बाईकसोबत अनेक प्रकारच्या अॅक्सेसरीजही देणार आहे.
किंमत किती
Royal Enfield Shotgun 650 ची एक्स-शोरूम किंमत ४.२५ लाख रुपये आहे. ही कंपनीची प्रीमियम फ्लॅगशिप बाईक आहे पण सुरुवातीला फक्त मर्यादित युनिट्सच विकल्या जातील.