रॉयल एनफिल्ड कंपनीच्या बाइक्सचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. बुलेटची क्रेझ तर कॉलेजच्या तरुणांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच पाहायला मिळते. प्रत्येकाला असे वाटते की, माझ्याकडेही एक बुलेट बाइक असायला हवी. या बाईकचा लूक, तिचे फीचर्स लोकांना खूप आकर्षित करतात.रायडर्सच्या गरजा लक्षात घेऊन नवीन रॉयल एनफिल्ड ‘विंडफेरर व्ही २’ नावाचे नवीन जॅकेट लाँच केले आहे.रायडरच्या स्टाईल आणि कम्फर्टबरोबरच सेफ्टीचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.

रॉयल एनफिल्ड विंडफेअर व्ही२ चे खास फीचर्स (Royal Enfield Windfarer V2 features) :

विंडफेअर व्ही२ मध्ये (Windfarer V2) दोन लेअर म्हणजेच पॉलिस्टर जाळी आणि मजबूत ६०० डी (600D) पॉलिस्टर फॅब्रिक आहे; जे रॉयल एनफिल्डच्या टिकाऊपणा आणि गुणवत्तेचे एक उत्तम उदाहरण आहे. खांदे आणि कोपरांवर ६१० डी (610D) पॉलिस्टर कॉर्डारा पॅच वापरण्यात आला आहे. त्यामुळे अपघातादरम्यान या भागांमध्ये होणाऱ्या दुखापतींपासून चालकांचे संरक्षण होऊ शकेल.

रॉयल एनफिल्डने सिटी रायडिंग, तसेच क्रूझर रायडिंगसाठी हे नवीन रायडिंग जॅकेट लाँच करण्यात आले आहे. हे जॅकेट रायडर्सना पूर्णपणे फिट बसावे यासाठी कंबर, बायस्पेस, हाताच्या बाजूला टॅब प्रदान केले गेले आहेत. तसेच खांदा आणि कोपर यांच्या संरक्षणासाठी या जॅकेटमध्ये एर्गो प्रो-टेक सीई लेव्हल २ संरक्षकाचा वापर करण्यात आला आहे. तसेच छातीच्या सेफ्टीसाठी एक पॉकेट देण्यात आले आहे.

हेही वाचा…नाद करायचा नाय! बाकी कंपन्यांची झोप उडणार, पुढल्या वर्षी दाखल होताहेत ‘या’ ४ स्वस्त कार; एका कारची बुकींगही सुरु

नवीन रॉयल एनफिल्ड विंडफेअर V2 रायडिंग जॅकेटमध्ये हवामान संरक्षण फीचर म्हणून विलीन केलेले रेन लायनर आहे; ज्यामध्ये जोडलेले थर्मल वेगळे करण्यायोग्य आहे आणि ते स्वतंत्रपणेही परिधान केले जाऊ शकते. त्यामध्ये राइडर्सच्या आरामासाठी कुशन्ड कम्फर्ट कॉलरचा वापर करण्यात आला आहे. या जॅकेटमध्ये व्हेंटिलेशन आणि दृश्यमानतेचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. तसेच रक्तगट, नावे इत्यादी वैयक्तिकृत करण्यासाठी डाव्या खांद्यावर ‘वेल्क्रो पॅच’ डिझाइन करण्यात आले आहे. तसेच यात एकूण चार खिसे आहेत. त्यापैकी पुढचे दोन खिसे, छातीच्या भागावरील खिसा व एक ‘पॉकेट लायनिंग’ खिसा आतमध्ये आहे आणि विंडफेअर V2 मध्ये 2-वे YKK झिपर्स आहेत.