scorecardresearch

Second Hand Car बाबतचे नियम बदलण्यात आले; जाणून घ्या याचा काय फायदा होणार

सेंकड हँड गाडी विकण्याच्या आणि विकत घेण्याच्या नियमात कोणते बदल करण्यात आले आहेत जाणून घ्या

Second Hand Car बाबतचे नियम बदलण्यात आले; जाणून घ्या याचा काय फायदा होणार
सेकंड हँड गाडी विकण्याचे, विकत घेण्याच्या नियमात बदल करण्यात आले (Photo: Indian Express)

स्वतःची गाडी असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण वाढत्या महागाईमध्ये आर्थिक गणित सांभाळत अनेकांना हे स्वप्न पुर्ण करता येत नाही. मग त्यासाठी सेकंड हँड गाडी घेण्याचा निर्णय घेतला जातो. तुम्ही देखील सेकंड हँड गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर सेकंड हँड गाड्यांबाबत बदलण्यात आलेल्या नियमांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. सेकंडहँड गाडी विकत घेण्याबाबत आणि विकण्याबाबत सरकारकडुन कोणते नियम बदलण्यात आले आहेत जाणून घ्या.

रजिस्टर्ड डिलर विकणार गाडी

केंद्र सरकारकडुन कार विकणाऱ्या डिलर्सची नोंदणी अनिवार्य करण्याचा नियम जाहीर करण्यात आला आहे. आरटीओमध्ये नोंद असणाऱ्या डिलर्सच कार खरेदी किंवा विक्री करू शकतात. अशाप्रकारे डिलर्सद्वारे कारची खरेदी आणि विक्रीची प्रक्रिया झाल्याने ग्राहकांची फसवणूक टाळण्यास मदत मिळेल.

आणखी वाचा: Toyota Innova HyCross MPV भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स

या नियमांमुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे. जेव्हा कार विकत घेण्याची प्रक्रिया केली जाते तेव्हा डीलर ‘सेल लेटर’वर सही करतात. पण त्यानंतर गाडी विकण्याचो ही प्रक्रिया पुर्ण होण्यास काही वेळ लागतो. त्यामुळे त्या काळात कोण गाडी वापरते याबाबत माहिती नसते. पण नव्या नियमानुसार कार विकण्याआधी टी डीलरच्या नावे केली जाईल ज्यामुळे कारच्या मालकाला याबाबत चिंता करावी लागत नाही.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 20:14 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या