सध्या अनेकजण गाड्यांमधील खास फिचर्स आणि गाड्यांच्या कंपन्यांची चलती पाहून गाड्या खरेदी करत असतात. त्यात सध्या भारतीय स्कोडा गाड्यांना जास्त पसंती देत असल्याचं दिसत आहे. एवढेच नव्हे तर या कंपनीमध्ये बनणाऱ्या सगळ्या गाड्यांना पसंती मिळत आहे. स्कोडाच्या गाड्यांची तुफान विक्री पाहता कंपनी नवनव्या कार लाँच करत असते. आता कंपनीने आपली बंद केलेली कार नव्या अवतारात वर्षभरात लाँच केली आहे.

कार निर्माता स्कोडा ने भारतात 2024 Skoda Superb लाँच केले आहे. गेल्या वर्षी Skoda Superb ने भारतीय बाजारपेठेत हे मॉडेल बंद केले होते. आता वर्षभरानंतर स्कोडाने हे मॉडेल भारतात पुन्हा लाँच केले आहे. मात्र, २०२४ मध्ये स्कोडा सुपर्बचे बाजारात फक्त १०० युनिट्स लाँच केल्या आहेत. भारतासाठी नवीन स्कोडा सुपर्ब २.०-लिटर चार-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे, जे BS6 फेज २ एमिशन नॉर्म्सने मॅच करण्यासाठी अपडेट केलं गेलं आहे. हे इंजिन १८७bhp पॉवर आणि ३२०Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ७-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Toyota Innova Hycross GX(O) launch
XUV700, Scorpio सर्व विसरुन जाल! देशात आली ७ रंगांत ८ सीटर कार, मोठ्या कुटुंबियांसाठी आहे बेस्ट
Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

(हे ही वाचा : मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ‘ही’ नवी हायब्रिड कार, कधी होणार भारतात दाखल? )

या नव्या कारला संपूर्ण LED लाइटिंग सेटअप – हेडलाइट्स, DRLs, फॉग लाइट्स आणि टेल लाइट्स आणि नवीन १८-इंच अलॉय व्हील मिळतात. इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात ९.२-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आणि १०.२-इंच इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आहे. इन्फोटेनमेंट स्क्रीन वायर्ड Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते.

नवीन सुपर्बला ३-झोन क्लायमेट कंट्रोल, एलईडी इंटीरियर लाइट्स, टू-स्पोक लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील आणि मागील खिडक्या आणि विंडस्क्रीनसाठी रोल-अप सन व्हिझर्स देखील मिळतात. सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर, २०२४ स्कोडा सुपर्ब हे प्रौढ आणि लहान मुलांसाठी युरो NCAP कडून ५-स्टार सुरक्षा रेटिंगसह येईल. नवीन सुपर्बमध्ये ९ एअरबॅग, आपत्कालीन ब्रेकिंग आणि ३६०-डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Skoda Superb ची एक्स-शोरूम किंमत ५४ लाख रुपये आहे. ग्राहक 2024 Skoda Superb ऑनलाइन किंवा त्यांच्या जवळच्या स्कोडा डीलरशिपवर बुक करू शकतात आणि डिलिव्हरी या महिन्याच्या शेवटी सुरू होईल, अशा माहिती आहे.