भारतात येत्या गुरुवारी म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२१ रोजी स्कोडा स्लॅविया गाडी लॉन्च होणार आहे. या गाडीच्या अनावरणापूर्वी कंपनीने गाडीतील इंटेरिअर टीझ केलं आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगले फिचर्स मिळतील. मात्र असं असलं तरी, गाडीची किंमतीबाबतची घोषणा अजूनही केलेली नाही.

  • स्कोडा कारचे डिझाईन चेक ब्रँडच्या नवीन डिझाईनच्या धर्तीवर करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कंपनीच्या शेअर इनवाइटद्वारे देण्यात आली आहे. कारची रचना MQB A0-IN प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. या कारचा लूक थोडासा स्कोडाच्या नेक्स्ट जनरेशन कार ऑक्टाव्हियासारखा दिसतो.
  • स्लॅव्हिया स्कोडाची दुसरी सर्वात लांब आणि रुंद कार आहे. या कारची लांबी ४५४१ मिमी, रुंदी १७५२ मिमी आणि उंची १४८७ मिमी आहे. याशिवाय MQB A0-IN प्लॅटफॉर्मसह आतील जागा आणि चांगले ग्राउंड क्लिअरन्स मिळण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना अधिक चांगली लेग रूम मिळेल, जी २६५१ मिमीची आहे, ज्या अंतर्गत व्हीलबेस देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • कारमध्ये १०.१ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, टच-सेन्सिटिव्ह एअर-कॉन कंट्रोल्स, वायरलेस ऍपल आणि अँड्रॉइड सपोर्टसह कारप्ले सारखी वैशिष्ट्ये मिळतील. या कारमध्ये ऑटो, रिव्हर्स कॅमेरा, एलईडी हेडलॅम्प, कूल्ड सीट्स, वायरलेस चार्जिंग पॅड यांसारखे काही आकर्षक फिचर्स देखील दिले जाऊ शकतात.
  • सुरक्षिततेच्या दृष्टीने यात सहा एअरबॅग्ज, EBD आणि ABS, TCS, स्पेशल ब्रेकिंग सिस्टीम आणि, हिल स्टार्ट असिस्ट, हिल होल्ड कंट्रोल, अँटी स्लिप रेग्युलेशन आणि मोटर स्लिप रेग्युलेशन, ब्रेक डिस्क वाइपिंग, रोल ओव्हर यांसारखी वैशिष्ट्ये असतील.
  • स्कोडा स्लॅव्हियाच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात १.० लीटर ३ सिलेंडर TSI पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. जे ११५ hp पर्यंत पॉवर जनरेट करण्यास सक्षम असतील. दुसरीकडे, १.५ लीटर ५ सिलेंडर TSI इंजिनसह मिळण्याची शक्यता आहे. स्लॅव्हियाला ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असण्याची शक्यता आहे.