scorecardresearch

टाटा मोटर्सची ‘ही’ नवीन एसयूव्ही लवकरच करणार बाजारपेठेत पदार्पण; जाणून घ्या या कारचे आकर्षक फीचर्स

देशातील सर्वात मोठी कार्स उत्पादक टाटा मोटर्स देशांतर्गत बाजारपेठेत वेगाने वाहनांची रेंज वाढवत आहे.

टाटा मोटर्सची ‘ही’ नवीन एसयूव्ही लवकरच करणार बाजारपेठेत पदार्पण; जाणून घ्या या कारचे आकर्षक फीचर्स
(Pic Credit – TATA)

टाटा मोटर्स ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादन करणाऱ्यांपैकी एक आहे. भारतामध्ये लवकरच टाटा कंपनी मध्यम आकाराची ‘एसयूव्ही ब्लॅकबर्ड’ नावाची कार बाजारपेठेत लाँच करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, टाटा कंपनीने या कारसाठी काम ही सुरु केले आहे. ब्लॅकबर्ड ही कार ह्युंदाई कंपनीच्या मध्यम आकराच्या क्रेटा या कार सोबत स्पर्धा करेल, अशी माहिती आहे.

टाटा मोटर्स कंपनीने अजून ब्लॅकबर्ड कार कधी लाँच होईल, याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार टाटा मोटर्स आपली ब्लॅकबर्ड ही कार अगदी आगामी वर्षाच्या सुरुवातीला लाँच करेल, असा अंदाज लावण्यात आलेला आहे. या कारबाबत आणि तिच्या काही खास वैशिष्ट्यांबाबत आपण जाणून घेऊया.

कसे असेल टाटाचे इंजन
कंपनी यामध्ये १.५ लीटर क्षमतेचे पावरफुल पेट्रोल-डिझेल इंजिन वापरणार आहे. इतर कारच्या तुलनेत ही कार तिच्या आकर्षक लूकसाठी अधिक प्रभावी ठरणार आहे. ही एसयूव्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह दिली जाईल.

(आणखी वाचा : ‘2023 Kawasaki Ninja ZX-10R’ भारतात सादर; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स )

कारची खास फीचर्स
या एसयूव्हीच्या फीचर्सबद्दल कोणतीही माहिती मिळाली नसली तरी यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (एफबीडी), ब्रेक असिस्ट, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (व्हीएसएम) मिळेल. इलेक्ट्रॉनिक स्टैबिलिटी कंट्रोल (ईएससी) प्रदान केले जाऊ शकते. मजबूत बॉडी आर्किटेक्चर, कूप-स्टाईल बॉडी डिझाइन आणि आकर्षक इंटिरियर्स इत्यादी अनेक लेटेस्ट फीचर्स या एसयूव्हीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात.

आता कंपनी या एसयूव्हीची किंमत काय ठरवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कंपनीच्या वाहन पोर्टफोलिओमध्ये टाटा नेक्सॉन ही सध्या सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे, जी ५ स्टार सुरक्षा रेटिंगसह सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata company will soon launch its new suv in the market

ताज्या बातम्या