Tata Punch EV: सध्या, टाटा मोटर्स भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत आघाडीवर आहे, तिचा बाजारपेठेत सर्वाधिक हिस्सा आहे. टाटाची नेक्सॉन ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. या व्यतिरिक्त टाटाने आपल्या Tiago आणि Tigor चे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील लाँच केले आहेत, जे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आता टाटा मोटर्स आपल्या ईव्ही पोर्टफोलिओचा आणखी विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. २०२३ ऑटो एक्सपोमध्ये, टाटा मोटर्सने त्यांच्या हॅरियर SUV ची EV आवृत्ती प्रदर्शित केली, जी लवकरच बाजारात आणण्याचा प्रयत्न करेल. टाटा त्याच्या पोर्टफोलिओमध्ये या SUV ला नेक्सॉन EV च्या वर ठेवेल. त्यामुळे टाटाची एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक एसयूव्ही नेक्सॉन (EV) असेल का? असा प्रश्न पडला आहे. कदाचित टाटा मोटर्स नेक्सॉनच्या खाली आणखी एक इलेक्ट्रिक एसयूव्ही आणण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स पंच मायक्रो एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन २०२३ च्या अखेरीपूर्वी लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे जनरल 2 (सिग्मा) प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते, जे ALFA आर्किटेक्चरची सुधारित आवृत्ती आहे. (हे ही वाचा : टाटा-महिंद्राच्या सगळ्या गाड्या होणार फेल, मारुती नव्या अवतारात आणतेय देशातली सर्वात स्वस्त कार ) Tata Altroz देखील अल्फा आर्किटेक्चरवर आधारित आहे परंतु Tata Punch EV साठी, ती इलेक्ट्रिक SUV म्हणून बदलली जाईल. त्याला एक सपाट मजला दिला जाईल, जेणेकरून तेथे मोठा बॅटरी पॅक बसवता येईल. मिनी एसयूव्ही दोन बॅटरी पॅक पर्यायांसह उपलब्ध केली जाऊ शकते. त्याचा छोटा बॅटरी पॅक २६kWh चा असू शकतो, तो Tiago EV सह बॅटरी पॅक असेल. त्याचवेळी, दुसरा बॅटरी पॅक Nexon EV वरून घेतला जाऊ शकतो, जो ३०.२kWh चा असेल. तथापि, कंपनीने Tata Punch EV बद्दल कोणतीही माहिती सामायिक केलेली नाही किंवा चाचणी दरम्यान ती कधीही दिसली नाही. पण, जर ती लाँच झाली तर ती देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. याची किंमत १० ते १४ लाख रुपयांच्या श्रेणीत आणली जाण्याची शक्यता आहे.