scorecardresearch

Bajaj Auto: आनंदाची बातमी! फक्त १५ हजारांमध्ये घरी घेऊन या Bajaj Platina 110, देणार ‘इतके’ जबरदस्त मायलेज

Bajaj ही एक वाहन उत्पादन कंपनी आहे. ही कंपनी दुचाकी, तीच व चार चाकी वाहनांचे उत्पादन करते

Bajaj Platina 110 Abs price and features
Bajaj Platina 110 – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

बाजारात चांगल्या मायलेज देणाऱ्या बाईकच्या कंपन्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये Hero MotoCorp पासून Honda , Bajaj , Yamaha अशा अनेक कंपन्या आहेत. त्यामध्ये बजाजच्या एका खास बाइकबदल आज आपण जाणून घेणार आहोत. Bajaj ही एक वाहन उत्पादन कंपनी आहे. ही कंपनी दुचाकी, तीच चाकी वाहनांचे उत्पादन करते तर कंपनीची चार चाकी गाड्या तयार करण्याची फॅक्टरी पुण्यात आहे. बजाज हे मजबूत आणि शक्तिशाली इंजिनसाठी ओळखले जाते. Bajaj Platina 110 बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

बजाज प्लॅटिना ११० चे फीचर्स

बजाज प्लॅटिना ही बाईक मायलेजसाठी ओळखली जाते. प्लॅटिना बाईक एका लिटरमध्ये ८४ किमी धावते. या बाइकचे इंजिन हे ११५.४५ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ८.६० पीएस ची पॉवर आणि ९.८१ एनएम चा पीक टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये ४ गिअर येतात. तसेच या बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाल्यास समोरील चकमध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चकमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. ज्यामध्ये सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम जोडण्यात आली आहे.

हेही वाचा : Bajaj ने आणली शक्तिशाली इंजिनची ‘ही’ कार; मायलेजपासून किंमतीपर्यंत सर्व काही आहे बेस्टच बेस्ट

बजाज प्लॅटिनाची किंमत ?

बजाज प्लॅटिना बाईकची किंमत ही ७२,२२४(एक्स-शोरूम) रुपये इतकी आहे. तर ऑन रोड या गाडीची किंमत ८८,०५८ रुपये आहे. जर तुम्हाला ही बाईक फायनान्स प्लॅनद्वारे विकत घ्यायची असेल तर तुम्ही फक्त १५,००० रुपये भरून ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता. मात्र फायनान्स प्लॅन घेण्यापूर्वी त्यातील सर्व बाबी तपासून घेणे आवश्यक आहे.

काय आहे फायनान्स प्लॅन ?

बजाज प्लॅटिना खरेदी करण्यासाठी जर तुम्ही फायनान्स प्लॅन घेतला तर तुम्ही १५,००० रुपयांचे डाऊन पेमेंट करून प्लॅटिना घरी घेऊन येऊ शकता. फायनान्स प्लॅननुसार बँक तुम्हाला या गाडीवर ७३,०५८ रुपयांचे कर्ज देऊ शकते. या गादीवर तुमचे कर्ज मंजूर झाले की , तुम्हाला १५,००० रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी दर महिन्याला २,३४७ रुपयांचा हप्ता तुम्हाला भरावा लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बजाज प्लॅटिना ११० ही बाईक घरी घेऊन येऊ शकता.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 12:15 IST