scorecardresearch

Bajaj ने आणली शक्तिशाली इंजिनची ‘ही’ कार; मायलेजपासून किंमतीपर्यंत सर्व काही आहे बेस्टच बेस्ट

Bajaj News : हे असे वाहन आहे की, जे तीन चाकी, चार चाकी वाहनांमध्ये त्याची गणना केली जाते.

Bajaj ने आणली शक्तिशाली इंजिनची ‘ही’ कार; मायलेजपासून किंमतीपर्यंत सर्व काही आहे बेस्टच बेस्ट
Bajaj Qute 4W- (Image Credit- BajajAuto.com )

Bajaj ही एक वाहन उत्पादन कंपनी आहे. ही कंपनी दुचाकी, तीच चाकी वाहनांचे उत्पादन करते तर कंपनीची चार चाकी गाड्या तयार करण्याची फॅक्टरी पुण्यात आहे. २०१८ मध्ये बजाजने आपली ४ व्हिलर लाँच केली होती. अनेक लोकांनी ही कार पहिली असेल पण त्याबद्दल माहिती नसेल. अनेक लोकांनी ही कार पहिली असेल पण त्याबद्दल माहिती नसेल. ‘बजाज क्युट’ 4W (Bajaj Qute)असे गाडीचे नाव आहे. याचा व्यावसायिक वापर देशात होत आहे. मात्र आता ती खासगी कार म्हणून लाँच करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याला एनसीएटी (NCAT) कडून परवानगी मिळाली आहे. या कारमध्ये ४ ते ५ जण सहजपणे बसू शकतात.

हे असे वाहन आहे की, जे तीन चाकी, चार चाकी वाहनांमध्ये त्याची गणना केली जाते. त्यामुळे याला चालवताना कारला जे नियम असतात ते पाळण्याची गरज नाही. याची रचना कारसारखी करण्यात आली आहे. कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही यामधून प्रवास करू शकता.

हेही वाचा : EMotorad कंपनीने लाँच केली अत्याधुनिक टेक्नॉलॉजीची ‘ही’ E-Bike; जाणून घ्या खासियत

या कारला आता खासगी वाहन म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे आता ही कार तुम्ही ताशी ७० किमी या स्पीडने चालवू शकता. ताशी ७० किमी हा मर्यादित स्पीड असण्याची शक्यता आहे. याचे इंजिन बजाजने अधिक शक्तीशाली बनवले असून, १०.८ बीएचपी वरून ते आता १२.८ बीएचपी या क्षमतेचे करण्यात आले आहे. तसेच याचे वजनही १७ किलोंनी वाढवण्यात आले आहे. बजाज क्युटचे वजन हे ४५१ किलो आहे. याच्या सिनेजी मॉडेलचे वजन हे ५०० किलोपेक्षा जास्त होते. Bajaj Qute 4W मध्ये स्लाइडिंग विंडो आहेत.यात एसीचे फिचर नसणार आहे. याचे इंजिन मागील बाजूस असणार आहे.

या कारमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले असून जुन्या मॉडेलपेक्षा याच्या इंजिनमध्ये तसेच मायलेजमध्ये बदल करण्यात आलेलं आहेत. बजाजच्या या ‘क्युट’ गाडीमध्ये ४ ते ५ लोकं बसू शकणार असून याची किंमत साधारणपणे २.८० लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 12:18 IST

संबंधित बातम्या