महिंद्रा कंपनीची थार ही गाडी अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. आता हीच महिंद्राची थार गाडी तर एंडेव्हरपेक्षाही मोठी दिसते. जीप रँग्लरच्या तुलनेत थार ही परवडणारी ऑफ-रोडिंग कार असल्याने लोकांच्या पसंतीस उतरलीया हे. पण आता आपण अशी थार बघणार आहोत ज्यासाठी गाडीच्या मालकाने तब्बल ११ लाख रुपये खर्च केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक व्हिडीओ सध्या युट्युब वर अपलोड झाला आहे. या यूट्यूबरने जम्मूमध्ये राहणाऱ्या थारच्या मालकाची मुलाखत घेतली. ज्याची मुलाखत घेतली त्याची थार आकर्षक अशी एसयूव्हीसारखी दिसत होती. यामध्ये एक गोष्ट लगेच लक्षात येते ती म्हणजे त्या गाडीचे ३७ इंचाचे अलॉय व्हील्स. याशिवाय त्या गाडी मालकाने एक्सट्रा ५ इंचाचे लिफ्ट किट इन्स्टॉल केले आहे.कोणत्याही परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी एसयूव्हीच्या अनेक ठिकाणी लाल टो हुक्स दिसतात. हे सर्व भाग थार गाडीच्या चेसिसवर बसवण्यात येतात. या गाडीचे लाईट्स बदलले असून त्याला एक्सट्रा लाईट्स सुद्धा लावण्यात आले आहेत. बंपरच्या खाली एक हेवी ड्युटी स्किड प्लेट बसवली आहे जी थारचे संरक्षण करते.

हेही वाचा : Maruti Nexa Black Edition भारतात झाली लॉन्च; जाणून घ्या फीचर्स

मागील बाजूस स्टेपनी आहे.५ फुटाचा अँटीना बसवला असून मालक त्याला गाडीत बसून कंट्रोल करू शकतो. याचे स्पेंशन आणि कनेक्टिंग रॉड्स योग्यरित्या अपग्रेड केले आहेत परंतु त्याचा स्टीयरिंग वजनावर झालेला नाही. त्या गाडीच्या बाजूला फोर्ड एन्डेव्हर ही गाडी होती आणि ती ‘या’ ठरसमोर लहान दिसत आहे. थार गाडीच्या नेक्स्ट जनरेशनवर या गाडीच्या मालकाला ३५ लाख रुपये खर्च करण्यासाठी इच्छा आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The mahindra thar looks bigger than a ford andover and the owner has spent lakhs of rupees on it tmb 01
First published on: 06-01-2023 at 15:16 IST