Bajaj CT 110X Bike Offer: दुचाकी वाहनांमध्ये आघाडीची कंपनी बजाज ही मागील कित्येक वर्षांपासून मध्यमवर्गीय ग्राहकांच्या घरोघरी पाहायला मिळत आहे. बजाजची Bajaj CT 110X ही प्रसिद्ध बाईक मायलेज व स्टायलिश डिझाईनमुळे अनेकांच्या पसंतीला उतरते. यासोबतच या बाईकची किंमतही आता ग्राहकांना आकर्षित करत आहे. बजाज सी टी ११० एक्स बाईकचे दोन नव्हे व्हर्जन सध्या कंपनीने बाजारात दाखल केली आहेत ज्यात इलेक्ट्रिक स्टार्ट म्हणजेच सेल्फ स्टार्टसारखी अद्यतनित सुविधा सुद्धा ग्राहकांना देण्यात आली आहे. Bajaj CT 110X चे भन्नाट फीचर व सामान्य वर्गासाठी ही बाईक का बेस्ट ठरते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

बजाज सीटी 110 एक्सचे फीचर्स

  • बजाज सीटी 110 एक्स मध्ये कंपनीनी ११५ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे.
  • या इंजिनची क्षमता ८. ६ पीएस असून तसेच ९.८१ एनएम पॉवर पीक स्टार्ट सुद्धा दिला जातो.
  • इंजिनासह ४ स्पीड गियरबॉक्स दिलेला आहे.
  • बजाजने केलेल्या दाव्यानुसार या बाईकचे मायलेज प्रति १ लिटर पेट्रोलमागे १०४ किमी इतके आहे.
  • ब्रेक सिस्टीम विषयी सान्गायचे तर कंपनीने फ्रंट व रेयर दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक दिले आहेत,
  • सोयाबीतच कॉम्बो ब्रेकिंग सिस्टीम सुद्धा जोडण्यात आली आहे.
  • बाईकच्या चाकांमध्ये अलॉय व ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

Bajaj CT 110X किंमत

बजाज सीटी 110 एक्स चे सेल्फ स्टार्ट व्हर्जन या कंपनीचे सध्याचे टॉप मॉडल आहे ज्याची किंमत ६६, २९८ रुपये इतकी आहे. ऑन रोड स्थितीत ही किंमत थोडी अधिक म्हणजेच ८०, ४६० रुपये इतकी आहे. पण तुमच्यासाठी एक खास ऑफर आपण आज जाणून घेणार आहोत, एका भन्नाट प्लॅनसह रोजच्या अवघ्या ७७ रुपयात तुम्ही ही नवी कोरी बाईक स्वतःच्या घरी घेऊन जाऊ शकता.

how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

Bajaj CT 110X खरेदीसाठी बचतीचा प्लॅन

अवघ्या ८ हजार रुपयांच्या डाऊनपेमेंट सह आपण बजाज सीटी 110 एक्स विकत घेऊ शकता. याव्यतिरिक्त वरील रक्कम म्हणजेच ७२, ४६० रुपये आपल्याला द्यायचे आहेत त्यासाठी बँकेकडून ९. ७ टक्के वार्षिक व्याजदरासह अगदी सहज कर्ज मिळू शकते. यानुसार पुढील तीन वर्ष तुम्हाला प्रत्येक महिन्यात २,३२८ रुपये म्हणजेच दिवसाला जवळपास ७० ते ८० रुपये ईएमआय भरायचा आहे.