देशातील ऑटो क्षेत्रातील कार आणि बाईक व्यतिरिक्त इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादकांनी देखील त्यांच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. या आकडेवारीनुसार, Okina, Ampere Hero Electric कंपन्या सर्वोत्तम ठरल्या आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जून २०२२ पर्यंत त्या टॉप ३ कंपन्यांचे संपूर्ण सेल्स डिटेल येथे जाणून घ्या. जेणेकरून तुम्ही सहजपणे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.

Okinawa Autotech: ओकिनावा ऑटोटेक हे अल्पावधीतच इलेक्ट्रिक टू व्हीलर क्षेत्रात मोठे नाव बनले आहे. ज्याने बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर्सची लाँग रेंज लॉंच केली आहे. ओकिनावाने जून २०२२ मध्ये तिच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ६,९८२ युनिट्सची विक्री केली आहे, तर मे २०२२ मध्ये कंपनीने तिच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ९,३०२ युनिट्सची विक्री केली आहे. विक्रीतील या मोठ्या घसरणीनंतरही कंपनी जून महिन्यात पहिले स्थान काबीज करण्यात यशस्वी झाली आहे.

आणखी वाचा : २ लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतेय Hyundai i20, जाणून घ्या ऑफर

Ampere Vehicles: अँपिअर व्हेहिकलने छोट्या रेंजमधील स्कूटर बाजारात आणल्या आहेत, मात्र या स्कूटर्सच्या जोरावर कंपनीचे मोठे नाव झाले आहे. Ampere ने जून २०२२ मध्ये तिच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ६,५४१ युनिट्सची विक्री केली आहे तर मे २०२२ मध्ये कंपनी तिच्या इलेक्ट्रिक स्कूटरची फक्त ५,८३८ युनिट्स विकू शकली. विक्रीतील या वाढीमुळे कंपनी देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी बनली आहे.

Hero Electric: हिरो इलेक्ट्रिक हे या विभागातील एक मोठे आणि जुने नाव आहे ज्यात इलेक्ट्रिक दुचाकींची मोठी रेंज आहे. कमी बजेटपासून ते मोठ्या रेंजपर्यंतच्या स्कूटर्स उपलब्ध आहेत.
Hero Electric ने जून २०२२ मध्ये ६,५०३ इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत, तर मे २०२२ मध्ये कंपनी फक्त २,८५१ युनिट्स विकू शकली आहे. विक्रीतील या प्रचंड वाढीमुळे कंपनी देशातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी बनली आहे.

आणखी वाचा : तुम्हाला फास्ट स्पीडची आवड असेल तर केवळ ३० हजारांत घ्या Bajaj Pulsar NS200

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या यादीतील चौथ्या आणि पाचव्या स्थानाबद्दल बोलायचे झाल्यास, ओला इलेक्ट्रिक चौथ्या स्थानावर आहे जे या विभागातील पहिल्या स्थानावर होते. जे जून २०२२ मध्ये केवळ ५,८८४ युनिट्स विकू शकले. पाचव्या स्थानावर एथर एनर्जी आहे ज्याने जून महिन्यात आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या केवळ ३,८२४ युनिट्सची विक्री केली आहे.