scorecardresearch

Top 3 Mid Size SUV: कमी किमतीत स्टाईल आणि फिचर्ससह चांगल्या मायलेज देणाऱ्या मिड साइज एसयूव्ही

कार क्षेत्रात अलीकडच्या काळात मध्यम आकाराच्या एसयूव्ही कारची मागणी झपाट्याने वाढली आहे.

Top-3-Mid-Size-SUV
Top 3 Mid Size SUV: कमी किमतीत स्टाईल आणि फिचर्ससह चांगल्या मायलेज देणाऱ्या मिड साइज एसयूव्ही (फोटो- MARUTI SUZUKI)

कार क्षेत्रात अलीकडच्या काळात मध्यम आकाराच्या एसयूव्ही कारची मागणी झपाट्याने वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन वाहन उत्पादकांनी त्यांच्या मध्यम आकाराच्या एसयूव्ही या सेगमेंटमध्ये लाँच केल्या आहेत. जर तुम्ही मध्यम आकाराची एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येथे या विभागातील तीन टॉप मध्यम आकाराच्या एसयूव्हीबद्दल जाणून घ्या. या गाड्या प्रीमियम वैशिष्ट्ये, डिझाइन आणि मायलेजसह मध्यम श्रेणीमध्ये उपलब्ध आहेत.

Tata Nexon: टाटा नेक्सन ही त्यांच्या कंपनीची लोकप्रिय मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. गाडी किमत आणि सुरक्षितता वैशिष्ट्यांसाठी पसंत केली जाते. टाटा नेक्सनमध्ये १४९७ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे, ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. पेट्रोल इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, हे १.२ लीटर पेट्रोल इंजिन १२० पीएस पॉवर आणि १७० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. कंपनीने टाटा नेक्सनची सुरुवातीची किंमत ७.५५ लाख रुपये असून सह टॉप व्हेरियंटवर जाताना १३.९० लाख रुपयांपर्यंत जाते.

Hyundai Venue: ह्युंदाई वेन्यू ही त्याच्या कंपनीची मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटसह एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. ही कार किंमत, वैशिष्ट्ये आणि मायलेजसाठी पसंत केली जाते.ह्युंदाई वेन्यूच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर त्यात १४९३ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे १.२ लिटर पेट्रोल इंजिन ८३ पीएस पॉवर आणि ११४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ह्युंदाई वेन्यू कंपनीने ६.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच केली आहे. टॉप व्हेरियंटमध्ये जाताना ही किंमत ११.७२ लाख रुपयांपर्यंत जाते.

स्टायलिश स्विच इलेक्ट्रिक बाइकची जोरदार चर्चा, सिंगल चार्जमध्ये १२० किमीची रेंज

Maruti Vitara Brezza: मारुती विटारा ब्रेझा कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत येते. या मध्यम आकाराच्या एसयूव्हीला तिची किंमत, मायलेज आणि वैशिष्ट्यांसाठी प्राधान्य दिले जाते. मारुती विटारा ब्रेझाच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्यात १४६२ सीसी इंजिन दिले आहे, जे १.५ लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन १०५ पीएस पॉवर आणि १३८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल आणि ४ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. मारुती विटारा ब्रेझाची सुरुवातीची किंमत ७.८४ लाख रुपये आहे, जी त्याच्या टॉप व्हेरियंटवर जाताना ११.४९ लाख रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Top 3 mid size suv know about it rmt

ताज्या बातम्या