इलेक्ट्रिक कारमध्ये आतापर्यंत इलान मस्कच्या टेस्ला कारची स्पर्धा नव्हती, पण आता त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी ऑटोमेकर टोयोटा कंपनीने आपली नवीन कार सादर केली आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या ‘EV Toyota bZ3’चे अनावरण केले आहे, जे Tesla Model 3 शी स्पर्धा करेल. या सेडान इलेक्ट्रिक कारची विक्री पुढील वर्षापासून चीनमध्ये सुरू होईल, त्यानंतर ती युरोप आणि आशियातील इतर बाजारपेठांमध्ये विकली जाईल. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे एका चार्जवर ही गाडी ५९९ किमीपर्यंत चालवता येते. चला तर मग जाणून घेऊया टोयोटाच्या नवीन इलेक्ट्रिक सेडान कारबद्दल.

टोयोटा bZ3 EV मध्ये BYD बॅटरी

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

टोयोटा bZ3 इलेक्ट्रिक सेडान कार eTNGA प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. कारला BYD ची ब्लेड लिथियम-आयरन-फॉस्फेट बॅटरी तंत्रज्ञान मिळते, जी १० वर्षांनंतरही ९० टक्के क्षमतेवर कार्य करू शकते. या क्षणी त्याच्या शक्तीबद्दल जास्त माहिती नाही, परंतु कार निर्मात्याचा दावा आहे की, bZ3 ची रेंज सुमारे ५९९ किमी आहे.

आणखी वाचा : बाईक प्रेमींसाठी आनंदाची बातमी: Ola बाजारपेठेत दाखल करणार आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक!

टोयोटा bZ3 EV डिझाइन

लुक आणि डिझाइनच्या बाबतीत, bZ3 EV सेडान टोयोटाच्या कोरोला कारसारखी दिसते. याला बोनेटच्या संपूर्ण लांबीवर स्प्लिट हेडलॅम्प आणि एलईडी हेडलाइट्स मिळतात. तसेच, या कारमध्ये विंड रेझिस्टन्स रिअर बंपर आणि अॅल्युमिनियम चाके आणण्यात आली आहेत. bZ3 ची लांबी ४,२७५ एमएम, रुंदी १,८३५एमएम आणि उंची १,४७५एमएम आहे. या लांबीसह ते टेस्ला मॉडेल ३ पेक्षा मोठे होते.

टोयोटाच्या ‘फॅमिली लाउंज’ संकल्पनेनुसार सेडान गाडीचे इंटीरियर डिझाइन करण्यात आले आहे. याला डिजिटल बेट वैशिष्ट्य मिळते, जे मोठ्या पोर्ट्रेट-ओरिएंटेड सेंट्रल टचस्क्रीनचा वापर करते. ट्रे-टाइप कन्सोल स्मार्टफोन इंटिग्रेशन आणि वायरलेस चार्जिंगसह येतो. टचस्क्रीन एअर कंडिशनिंग, संगीत, बूट रिलीझ आणि व्हॉइस फंक्शन यांसारख्या विविध फंक्शन्स नियंत्रित करते.