scorecardresearch

TVS Motors ने मरीन ब्लू कलर थीमसह सादर केली NTORQ 125 Race Edition

TVS Motors ने संपूर्ण भारतात नवीन कलर थीम असलेल्या TVS Ntorq रेस एडिशनसाठी बुकिंग सुरू केली आहे.

TVS Motors ने मरीन ब्लू कलर थीमसह सादर केली NTORQ 125 Race Edition
(फोटो- TVS)

TVS Motors ने आपल्या लोकप्रिय स्कूटर TVS NTORQ 125 Race Edition ची 125 cc सेक्शनमध्ये नवीन वर्जन लाँच केली आहे, जी नवीन कलर थीम मरीन ब्लू मध्ये येईल.

TVS Ntorq 125 Race Edition चा मरीन ब्लू कलर थीम असलेली व्हेरियंट अतिशय आकर्षक दिसत आहे आणि स्पोर्टी फील देत आहे. या कलर थीम व्यतिरिक्त त्याची लाल-काळा, मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक ब्लू कलर थीम देखील खूप लोकप्रिय आहेत.

TVS Motors ने संपूर्ण भारतात नवीन कलर थीम असलेल्या TVS Ntorq रेस एडिशनसाठी बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा त्यांच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन ते बुक करू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार या स्कूटरची डिलिव्हरी देखील लवकरच सुरू केली जाणार आहे.

आणखी वाचा : अँटी थेफ्ट अलार्म असलेली ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर १२१ किमीचा रेंज देते

TVS NTORQ 125 Race Edition Marine Blue Price
मरीन ब्लू कलर थीमसह TVS Ntorq 125 रेस एडिशनची सुरुवातीची किंमत ८७,०११ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित करण्यात आली आहे.

TVS NTORQ 125 Race Edition Marine Blue Engine and Transmission
स्कूटरमध्ये १२४.८ cc चे ४ स्ट्रोक ३ वाल्व आणि सिंगल सिलेंडर इंजिन आहे. एअर-कूल्ड आणि फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजीवर आधारित हे इंजिन ९.३८ PS पॉवर आणि १०.५ Nm पीक टॉर्क जनरेट करते.

आणखी वाचा : Tata Tiago XE CNG 26 किमीचा मायलेज देते, खरेदी करण्यासाठी सोपा फायनान्स प्लॅन जाणून घ्या

TVS NTORQ 125 Race Edition Marine Blue Mileage
TVS Ntorq 125 Racing Edition ५६.२३ kms च्या मायलेजचा दावा करते ज्याला ARAI ने प्रमाणित केले आहे.

TVS NTORQ 125 Race Edition Marine Blue Speed
रेस एडिशनच्या स्पीडबद्दल TVS मोटर्सचा दावा आहे की, ही स्कूटर ९ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास वेग मिळवू शकते. यासोबतच कंपनीचा दावा आहे की त्याचा टॉप स्पीड ताशी ९० किलोमीटर आहे.

आणखी वाचा : केवळ ३० हजारांच्या बजेटमध्ये Honda Activa 6G घरी घेऊन जाऊ शकता

TVS NTORQ 125 Race Edition Marine Blue Features
TVS Ntorq 125 Race Edition TVS च्या Smart Connect अॅपसह येते, ज्याद्वारे स्मार्टफोन कनेक्ट करून अनेक हाय-टेक फीचर्स वापरली जाऊ शकतात. याशिवाय पास स्विच, ड्युअल साइड हँड लॉक, पार्किंग ब्रेक, इंजिन किल स्विच, यूएसबी चार्जर आणि २० लीटर अंडरसीट स्टोरेज यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tvs motors launches ntorq 125 race edition with marine blue color theme know price features and mileage prp

ताज्या बातम्या