दुचाकी क्षेत्रातील स्कूटर सेगमेंटमध्ये असलेली Honda Activa 6G ही त्याच्या सेगमेंटमध्ये तसेच देशात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. कंपनीने ही स्कूटर तीन व्हेरिएंटसह बाजारात आणली आहे.

Honda Activa 6G ची एक्स-शोरूम किंमत ७२,४०० ते ७५,४०० रुपये आहे. जर तुमच्याकडे शोरूममधून ही स्कूटर खरेदी करण्याचे बजेट नसेल, तर ही ऑपर तुमच्या उपयोगाची ठरू शकते. ऑफरचे तपशील वाचल्यानंतर तुम्ही ती अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकाल.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Maruti Suzuki Raises Prices of Select Vehicles Swift and Grand Vitara Included
मारुती सुझुकीकडून निवडक वाहनांच्या किमतीत वाढ
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत

तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरकडून किंवा मार्केटमधून सेकंड हँड Honda Activa 6G खरेदी करू शकता. परंतु आम्ही इथे त्या ऑफरबद्दल सांगत आहोत ज्या वेगवेगळ्या वेबसाइट्सवर अपलोड केल्या जातात. या वेबसाईट्स सेकंड हँड वाहनांची खरेदी आणि विक्री करतात.

आणखी वाचा : TVS मोटर्सने Apache RTR 160 आणि Apache RTR 180 चे अपडेटेड वर्जन केले लॉंच, हाय-टेक फीचर्स मिळतील

Honda Activa 6G चे सेकंड हँड मॉडेल खरेदी करण्याची पहिली ऑफर DROOM वेबसाइटवर लीस्ट करण्यात आली आहे. येथे या स्कूटरचे २०२० चे मॉडेल लीस्ट केले गेले आहे, ज्याची किंमत ३० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या स्कूटरची नोंदणी दिल्ली क्रमांकावर आहे. येथून ही स्कूटर खरेदी केल्यास तुम्हाला फायनान्स प्लॅन मिळेल.

दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर लीस्ट केली आहे. येथे दिल्ली क्रमांकासह Honda Activa 6G चे 2021 मॉडेल विक्रीसाठी लीस्ट केली आहे. यासाठी ३८,५०० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे, परंतु त्यासोबत कोणताही फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही.

आणखी वाचा : SHEMA Electric ने EV India Expo 2022 मध्ये सादर केल्या ३ नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, १३० किमीची रेंज

Honda Activa 6G वरील तिसरी ऑफर BIKE4SALE वेबसाइटवरून घेतली गेली आहे, जी सेकंड हँड बाईक विकते. येथे Honda Activa 6G चे २०२० चे मॉडेल ३६,९०० रुपयांच्या किंमतीसह विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या स्कूटरमुळे तुम्हाला प्लॅन किंवा कर्ज मिळणार नाही.

या सेकंड हँड Honda Activa वरील ऑफरचे तपशील वाचल्यानंतर, तुम्हाला त्याचे इंजिन, मायलेज, फीचर्ससह संपूर्ण तपशील माहित असणे आवश्यक आहे.

Honda Activa 6G मध्ये १०९.५१ cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ७.७९ पीएस पॉवर आणि ८.८४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ARAI ने प्रमाणित केलेल्या मायलेजनुसार ही स्कूटर एक लिटर पेट्रोलमध्ये ६० किमी मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.