scorecardresearch

नव्या अवतारामध्ये लॉन्च झाली देशातील सर्वात सुरक्षित SUV, २५ हजार रुपयांमध्ये मिळणार ‘हे’ जबरदस्त फिचर

या एसयूव्हीला अपडेट केल्याने कोणकोणते नवीन फीचर्स आणि फायदे मिळणार आहेत हे जाणून घेऊयात.

indias safest suv car
Taigun Gt plus (image credit- volkswagen)

भारतामध्ये फोर व्हिलर खरेदी करण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. तसेच मध्यम आकाराच्या SUV कारची देशभरात मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे वाहन कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झालेली पाहायला मिळते आहे. अनेक कंपन्या नवनवीन फिचर आणि टेक्नॉलॉजी असलेल्या आपल्या एसयूव्ही आणि इतर मॉडेलचे लॉन्चिंग भारतीय बाजारपेठेमध्ये करत आहेत. सध्या देशभरात HYundai Creta ही सर्वात जास्त विकली जाणारी मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. मात्र आता जर्मन कार निर्माता कंपनी Volkswagen ने त्यांची एक एसयूव्ही अपडेट केली आहे. तर या एसयूव्हीला अपडेट केल्याने कोणकोणते नवीन फीचर्स आणि फायदे मिळणार आहेत हे जाणून घेऊयात.

Volkswagen या कंपनीने आपली Taigun SUV अपडेट केली आहे. कंपनीने आता याच्या टॉप-स्पेक Taigun GT Plus यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्सचा पर्याय दिला आहे. मात्र हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला अधिकचे २५,००० रुपये मोजावे लागणार आहेत. या फीचरमुळे प्रवास करणाऱ्या लोकांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच Taigun GT Plus मध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह १० इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अ‍ॅम्बियंट लाइटिंग, इलेक्ट्रिक सनरूफ, क्लायमेट कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, वायरलेस चार्जिंग हे फीचर्स मिळतात.

हेही वाचा : स्मार्टफोनपेक्षाही कमी किमतीत घरी आणा, देशात सर्वाधिक विकली जाणारी बाईक, मायलेज ८० kmpl

या गाडीच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये TSI चे १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन तुम्हाला मिळणार आहे. जे १४८ बीएचपी आणि २५० एनएम टॉर्कसाठी ट्यून करण्यात आले आहे. हे इंजिन गाडीच्या ७ स्पीड DSG गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. व्हेंटिलेटेड सीट्स असणाऱ्या एसयूव्हींमध्ये Hyundai Creta, Kia Seltos, Tata Harrier, Tata Safari, MG Hector, Hyundai Alcazar आणि Skoda Kushaq यांचा समावेश आहे.

Tigun GT Plus – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

नवीन फीचर्ससह या एसयूव्हीची किंमत ही १८.९६ लाख (एक्सशोरूम) इतकी झाली आहे. Tigun GT Plus हे व्हेरिएंट तुम्ही व्हेंटिलेटेड सीट्सच्या फीचरशिवाय १८.७१ लाखांमध्ये खरेदी करू शकणार आहात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही एसयूव्ही ग्लोबल NCAP 5 स्टार रेटिंग असलेली देशातील सर्वात सुरक्षित एसयूव्ही आहे. याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ११..५५ लाख इतकी आहे. व्हेंटिलेटेड सीट्सच्या फीचरशिवाय या एसयूव्हीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 09:36 IST