दुचाकी क्षेत्रातील स्कूटर सेगमेंट अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यात १०० सीसी इंजिन ते १५० सीसी स्पोर्टी स्कूटरसह मायलेज स्कूटर देखील उपलब्ध आहेत. आज आम्ही स्कूटर सेगमेंटच्या १२५ सीसी स्कूटरबद्दल बोलत आहोत. चांगल्या इंजिनसह मायलेज देतात. आज आम्ही यामाहा फॅसिनो १२५ आणि टीव्हीएस ज्युपिटर १२५ स्कूटरची माहिती देणार आहोत. यातून तुम्ही तुमच्यासाठी योग्य स्कूटर निवडू शकाल.
Yamaha Fascino 125: यामाहा फसीने १२५ ही एक स्टायलिश आणि लांब मायलेज देणारी स्कूटर आहे. कंपनीने पाच प्रकारांसह बाजारात लाँच केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात १२५ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे ८.२ पीएस पॉवर आणि १०.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये कंपनीने त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिला आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर ६८.७५ किमीचा मायलेज देते आणि ARAI ने प्रमाणित केले आहे. यामाहा फसीनो १२५ स्कूटरची एक्स शोरुम किंमत ७२, ५०० रुपये असून टॉप व्हेरियंटवर ८१,३३० पर्यंत जाते.
जग्वार लँड रोव्हर कंपनीला ६७० मिलियन अमेरिकन डॉलर्सचं कर्ज देण्याचा निर्णय; कारण…
TVS Jupiter 125: टीव्हीएस ज्युपिटर ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. कंपनीने अलीकडेच नवीन फिचर्ससह बाजारात आणली असून तीन प्रकारात लॉन्च केली आहे. स्कूटरमध्ये १२४.८ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे ८.१५ पीएस पॉवर आणि १०.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही टीव्हीएस ज्युपिटर १२५ स्कूटर ६४ किमीचा मायलेज देते आणि ARAI ने प्रमाणित केले आहे. टीव्हीएस ज्युपिटर १२५ स्कूटरची सुरुवातीची किंमत ७५,६२५ रुपये (एक्स-शोरूम) असून टॉप व्हेरिएंटवर ८२,५७५ रुपयांपर्यंत जाते.