09 August 2020

News Flash

डोकॅलिटी

दिलेल्या सूचक माहितीवरून वर्तुळातील अक्षरसमूहाने शेवट होणारे शब्द आज तुम्हाला ओळखायचे आहेत.

|| ज्योत्स्ना सुतवणी

दिलेल्या सूचक माहितीवरून वर्तुळातील अक्षरसमूहाने शेवट होणारे शब्द आज तुम्हाला ओळखायचे आहेत.

सूचक माहिती :-

१) हा किती उगाळला तरी काळाच

२) काखेत कळसा अन् गावाला—

३) युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेली लेणी ४) मुंग्यांचे घर ५) देव-देवतांच्या मूर्तीना याचा लेप लावतात. ६) पोळा या सणाला— असेही म्हणतात. ७) कौतुक, प्रशंसा ८) नमन, नमस्कार

९) गोडीगुलाबीचा उपाय, मन वळवणे

१०) आदरातिथ्य, मानपान ११) लढाईच्या वेळेस सैन्य, पैसा इत्यादींची मदत

१२) हिंमत, कुवत.

 

उत्तरे :

१) कोळसा २) वळसा ३) वेरूळ ४) वारूळ ५) शेंदूर ६) बेंदूर ७) अभिनंदन

८) अभिवादन ९) सामोपचार  १०) पाहुणचार ११) कुमक १२) धमक

 

jyotsna.sutavani@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2019 4:26 pm

Web Title: loksatta puzzle game 16
Next Stories
1 आम्ही सारे चमत्कारी!
2 वारा पाहून पाठ फिरवणे
3 चित्रकार व्हायचंय!
Just Now!
X