साहित्य : कार्डपेपर (पिवळ्या रंगाचा), कात्री, गम, जरीच्या बॉर्डरचा तुकडा, टिकल्या, पेन्सिल, स्केचपेन, इ.
कृती : आपल्याला हव्या त्या आकाराच्या दुप्पट आकाराचा कार्डपेपर (आयताकृती) घ्या व आडवा दुमडा. या दुमडीच्या एका बाजूस आकृतीत दाखविल्याप्रमाणे उंटाचे धड पेन्सिलने काढून घ्या. दुसऱ्या तुकडय़ावर उंटाची मान व तोंड काढून कापून घ्या. उंटाचे धड दुमडीसकट दोन्ही भाग एकत्रपणे कापा. खालील पट्टी (पायाचे खूर करण्यासाठी) दोन्ही बाजू आतल्या बाजूस दुमडा व एकमेकांना चिकटवा. मस्त स्टॅण्ड तयार होईल. धडाला मानेच्या बाजूने तोंड चिकटवा. आपले उंटोबा झाले तयार! अशा प्रकारे आपण सर्व प्राणी तयार करून पेपर जंगल तयार करू शकतो.