शाळा झाली सुरू, आळस नका धरू
आनंदाने, उत्साहाने अभ्यास आपण करू
 
माय मराठीचा अभिमान फार
इंग्रजीला करू या आपला जोडीदार
 
गणिताच्या तासाची नको आता भीती
आकडेमोड करताना लक्षात ठेवू रीती

विज्ञानाचा तास शिकायचा खास
प्रयोगाच्या कृतीत सारे होऊ  पास
भूगोलात गोल पृथ्वी अनमोल
पर्यावरण शिकून साधू समतोल
 
इतिहासाची पाने सांगती कहाणी
देशासाठी लढणारे वीर, विरांगणी
 
आवडीने शिकू या आपण सारे विषय
आता नको अभ्यासाचे काडीइतके भय

एकनाथ आव्हाड