साहित्य : कणसाचे केस (कणीस सोलल्यावर आतमध्ये असणारे रेशमी तंतू), पेन्सिल, स्केचपेन, कात्री, गम, आगपेटीच्या चार काडय़ा.

कृती : छायाचित्रात दाखविलेले काही नमुने बघा व आठवा- अजून काय काय असतं रेशमी, मऊ, केसाळ  प्राणी, वस्तू काय असतं- जे तुम्ही चित्राच्या आधारे पूर्ण करू शकाल? आपण खाल्लेल्या कणसाची साले तर फेकून दिलीत. आता त्याचे केस वापरून तुम्ही अशा प्रकारे गमतीशीर चित्र काढू शकता. तुमच्या प्रकल्पांसाठी अशा चित्रांचा कलात्मकपणे वापर करू शकता.

अक्षरांचे नाते

bal04      अक्षरांमध्ये झाला

मोठा वाद,

जो तो म्हणू लागला

माझेच महत्त्व फार॥

‘ज’ ने मारली

अशी बढाई,

जग म्हणजे

आले सर्व काही॥

‘व’ म्हणाला

विश्व म्हणजे महान,

माझे अक्षर

किती छान छान॥

सारेच करू लागले

आपापली प्रशंसा,

कुणीही त्यात

मागे हटेना॥

‘आ’ म्हणाला – सर्वच जग

आईच्या पायाशी,

मी ‘आ’ सांगा

कमी आहे का कुणाशी?

आजी, आजोबा, आत्या,

माझ्याच अक्षराने होते,

माझे किती गोड

‘नात्यांशी’ नाते॥

– वसंत खेडेकर