साहित्य : दोन बिल्ले, कार्डपेपर, कात्री, फेव्हीबॉण्ड गम, रंग (पोस्टर कलर्स), ब्रश इ.
कृती : बिल्ल्याच्या बाहेरील आकारात कार्डपेपरची लांब उभी पट्टी कापा. या पट्टीला मधोमध दुमडा व दोन्ही कोपऱ्यांना बिल्ले (पोकळ बाजू आत) फेव्हिबॉण्ड गमच्या साहाय्याने चिकटवा. वर वजन ठेवून नीट वाळू द्या. बाहेरील बाजूस पोस्टर कलर्सने सुशोभित करा. बाप्पाच्या आरतीला या चिपळ्यांचा नाद सुरेख वाजवा.
डमरू
साहित्य : दह्याचे दोन उभे डबे, टिश्यू पेपर्स, सुतळ, कागद, कात्री, गम, रंग, जाड रिबीन, मोठे मणी, ब्रश इ.
कृती : दह्याच्या डब्यांचे स्टिकर्स गरम पाण्याने धुऊन काढून घ्या. दोन्ही डब्यांना टिश्यू पेपर्स गुंडाळून घ्या व पोस्टर कलरने रंगवा. डब्यांची झाकणे घट्ट (फेव्हीबॉण्ड) गमने चिकटवा व वाळू द्या. झाकणांना पांढरा कागद चिकटवा व मधोमध काळ्या रंगाचे गोल रंगवून घ्या. दोन्ही डबे वाळल्यावर एकमेकांवर उलटे चिकटवा. वरून सुतळ चिकटवा. वाटल्यास सुतळीला अॅक्रिलिक रंगात रंगवा व वाळू द्या. या जोडावरच (सॅटिन) रिबिनला दोन टोकांना मणी बांधून घ्या व गाठ मारा. झाला आपला डमरू तयार!
गणपतीच्या आरतीला टाळाची साथ करायला ही वाद्यं आपणच तयार करायचा आनंद काही औरच असतो.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2014 रोजी प्रकाशित
छोटय़ा चिपळ्या
साहित्य : दोन बिल्ले, कार्डपेपर, कात्री, फेव्हीबॉण्ड गम, रंग (पोस्टर कलर्स), ब्रश इ. कृती : बिल्ल्याच्या बाहेरील आकारात कार्डपेपरची लांब उभी पट्टी कापा.
First published on: 24-08-2014 at 01:18 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art corner