bm04साहित्य- आइस्क्रीमचे कप (रिकामे झालेले स्वच्छ), मोठे मणी, सॅटिन रिबीन, काचेवर रंगवायचे रंग, ब्रश, टिकल्या, कात्री इ. (उदबत्ती, काडेपेटी.)
कृती- आइस्क्रीमचे रिकामे कप स्वच्छ धुऊन घ्या. काच रंगवायच्या रंगाने रंगकाम व टिकल्यांच्या साहाय्याने सुशोभन करा. रंगवलेले कप पूर्णपणे वाळल्यावर खालील पृष्ठभागाच्या मध्यावर उदबत्तीच्या साहाय्याने छिद्र पाडून घ्या. सॅटिन रिबीनमध्ये मोठे मणी ओवा. सुशोभन केलेल्या कपांना एकमेकांमध्ये सॅटिन रिबीन व मोत्यांनी गुंतवून घ्या. घट्ट गाठ मारून मोती अडकवा. दोन्ही कप उलटे जोडल्यावर घंटीसारखे सुंदर दिसतील.
याचा वापर तुम्ही कार हँगर, सेंटर पीस, कॉर्नर पीस म्हणून वापर करू शकता. घरातला कचरा सत्कारणी लावा.
अर्चना जोशी – muktakalnubhauti@gmail.com