|| ज्योत्स्ना सुतवणी
सोबत दिलेल्या सूचक माहितीवरून तुम्हाला दोन अक्षरी शब्द शोधून शब्दसाखळी (अंताक्षरी) पूर्ण करायची आहे.
सूचक माहिती-
१) याची कणसे भाजून किंवा उकडून खातात.
२) या फणसातील गरे कडक, चवीला जास्त गोड व रुचकर असतात.
३) थर्मामीटरमध्ये याचा उपयोग केला जातो.
४) मेषपासून मीनपर्यंत एकूण १२ — आहेत.
५) शिजलेल्या भाताचा एक दाणा; थंड
६) —– तापला आहे तर भाकरी भाजून घ्या. (योग्य वेळी आपले काम साधून घ्यावे या अर्थाची म्हण)
७) पाणी किंवा द्रव पदार्थाचे उष्णतेमुळे बनणारे वायुरूप
८) जनावरांच्या अंगावरील मऊ व दाट केस ज्यांपासून टोप्या, जाकिटे बनवतात.
९) फाटलेले वस्त्र उभे-आडवे धागे घालून शिवणे
१०) उमललेली कळी
११) रोग होऊ नये म्हणून देण्यात येणारे प्रतिबंधक औषध.
१२) दोनने भाग जाणाऱ्या संख्यांना — संख्या म्हणतात.
उत्तरे-
१) मका २) कापा ३) पारा ४) राशी ५) शीत ६) तवा ७) वाफ ८) फर
९) रफू १०) फूल ११) लस १२) सम