सोमवार उजाडला, नेहमीची लगबग सुरू झाली. नदीवरच्या पुलांवर अचानक पाटय़ा आल्या त्याला एक आठवडा झाला; आणि अचानक काही तरी झालं. लोकांचे घोळके दिसू लागले. जागा मिळेल तेथे वाहन उभे करून लोक घोळक्यात घुसू लागले. ‘आता काय नवीन झालं’ म्हणत आणखी लोक लगबगीनं घोळक्याकडे जाऊ लागले.

ऑफिस, शाळा-कॉलेज विसरून लोक थांबले होते. बसमधल्या लोकांनीही चालकाला बस थांबवायला सांगितली. हॉर्न वाजवून चालक थकला, पण प्रवाशांचे काही फोटो आणि व्हिडीओ संपेनात. कॉलेजमधली मुले इन्स्टाग्रामवर स्टोरी किंवा फेसबुक लाइव्ह करत होते.

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

झालं काय नक्की?

शहरातल्या मोठय़ा रस्त्यांवर, मोक्याच्या जागी, चौकांमध्ये शिल्पे उभी होती. शिल्पेसुद्धा दगडाची किंवा धातूची नव्हती.

एका चौकात, वापरलेल्या पेपर कपपासून मनोरा तयार केला होता. शेजारी मोठा फलक होता. त्यावर लिहिले होते, की हे आहेत एका व्यक्तीने एका वर्षांत वापरलेले पेपर कप. शेजारी गणितही मांडले होते,

एका व्यक्तीचे ऑफिसमधले रोजचे दोन चहा म्हणजे दोन पेपर कप.

सोमवार ते शुक्रवार पाच दिवस म्हणजे ५ ७ २ म्हणजे आठवडय़ाचे १० पेपर कप.

महिन्याचे १० ७ ४ म्हणजे ४० पेपर कप.

वर्षांचे १२ ७ ४० म्हणजे ४८० पेपर कप.

ऑफिसची सुट्टी, रजा धरल्या तरी वर्षांला ४५० पेपर कप. म्हणजे एक व्यक्ती रोज चहा प्यायला पेपर कप वापरत असेल तर वर्षांचे ४५० पेपर कप इतका कचरा तयार होतो.

ऑफिसमध्ये १०० लोक काम करत असतील तर त्यांचे एका वर्षांचे होतात, ४५० ७ १०० = ४५,००० पेपर कप. एका पेपर कपची उंची असते साधारण २ इंच. पेपर कप, एक उलटा, एक सुलटा असे एकमेकांवर रचले आणि मनोरा तयार केला तर?

१०० लोकांनी एका वर्षांत वापरलेल्या पेपर कपचा मनोरा होतो ९०,००० इंच इतका म्हणजे ७५०० फूट.

म्हणजे किती मोठा माहीत आहे? कळसूबाई शिखर आहे ना? महाराष्ट्रातील सगळय़ात उंच शिखर? त्याची उंची आहे ५४०० फूट!

आपल्या शहरात अशी हजारो ऑफिसेस आहेत. आपल्या शहरात रोज किती पेपर कप वापरले जातात? किती कळसूबाई शिखरे त्यांतून तयार होतील?

हेही वाचा… बालमैफल: शांतिरूपेण संस्थिता..

एके ठिकाणी कचरा म्हणून टाकून दिलेल्या बाटल्या गोळा करून, त्यातून दोरा ओवून त्यांच्या माळा केल्या होत्या. तिथेही शेजारी गणित मांडून दाखवलं होतं- एका हॉटेलमध्ये किती बाटल्या वापरल्या जातात याचं.

एका मोठय़ा रस्त्याच्या फुटपाथवर टेबल होते. टेबलावर प्लास्टिकचा डबा होता, आपला टिफिन असतो ना, तो. शेजारी बशीत तीळ होते. मागे भिंतीला टेकवून फळा ठेवला होता. फळय़ावर लिहिलं होतं, प्लास्टिकचं विघटन होत नाही. त्याचे तुकडे मात्र पडतात. मोठय़ा तुकडय़ांचे लहान तुकडे होत जातात. प्लास्टिकचा तुकडा साधारण तिळाएवढा झाला की त्याला मायक्रोप्लास्टिक म्हणतात. मायक्रोप्लास्टिक वजनानं लहान असल्यानं सगळीकडे पसरतं, माती, ओढा, नदी, समुद्र.

हा टिफिन जेव्हा तुटेल आणि कचरा म्हणून टाकून दिला जाईल, तेव्हा पुढच्या काही वर्षांत त्याचे किती मायक्रोप्लास्टिक तयार होईल? एका टिफिनच्या पृष्ठभागावर किती तीळ मावतील? तेवढे मायक्रोप्लास्टिक एका डब्यापासून तयार होईल.

शाळेत ५०० विद्यार्थी असतील तर त्यांचे ५०० डबे म्हणजे किती मायक्रोप्लास्टिक? उत्तर फारच भयंकर होतं.

अशीच एकूण दहा शिल्पं शहराच्या विविध भागांत होती. मागच्या सोमवारी नदीवरच्या पुलांवर त्या पाटय़ा आणि आज हे. लोकांचे तर्कवितर्क सुरू झाले. चर्चेला उधाण आलं.

aditideodhar2017@gmail.com