भल्या पहाटे वाघोबा उठलेजोरजोरात खोकायला लागलेखोकल्याची उबळ थांबेनातोंडून डरकाळी फुटेनाहरीण वाऱ्यासारखं धावत सुटलं‘वाघोबाला आलाय खोकला’जंगलभर ओरडत सुटलं-म्याऊ म्याऊ वाघोबाची मावशी आलीवाघोबाला हळुवार थोपटू लागलीसाऱ्यांची मग भीती गेलीसारी वाघोबाभोवती गोळा झाली-मावशी म्हणाली, ‘वाघोबा आता स्वस्थ पडातुमच्यासाठी मी करते काढा.’काढय़ासाठी नव्हती मिरीआणायला धावत पळाली बकरीकाढय़ासाठी नव्हती सुंठलगबगीनं गेला आणायला उंटकाढय़ासाठी नव्हती लवंग-पिंपळीधावत घेऊन आली शेळीताजा मध आणला मधमाशीनंज्येष्ठमध आणला कोल्होबानंमाकडानी चुलीत विस्तव घातलादगडी भांडय़ात काढा रटरट शिजलाउंट, शेळी, जंगलचे सारे सारे प्रेमळमाझ्यासाठी करतात धावपळउगाच करतो मी यांचा छळवाघोबाच्या डोळ्यांतून झरले ओघळवाघोबाने काढा गटागटा घेतलावाघोबाचा खोकला दूर पळालावाघोबाच्या तोंडून फुटली डरकाळीजमलेली सारी धुम्म पळाली