श्रीकांत शेटे

परी आणि ससा 

 

स्वर्गातली एक परी

नेसून साडी भरजरी

उडत उडत एके रात्री

गेली चांदोबाच्या घरी

चांदोबाच्या घरात आलेला

खेळकर छोटासा ससा

परीला बघून, घाबरून

कुठेतरी लपलाच कसा

सशाला शोधून दमल्यावर

परीचा लागला डोळा

उष:काल होता अदृश्य झाली

पाहून सूर्याचा गोळा

लपून बसलेला ससा

मागाहून बाहेर आला

किरणांची शाल पांघरून

तुरुतुरु वनराईत पळाला..