सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष मंगळ-नेप्च्यूनच्या नवपंचम योगामुळे शारीरिक शक्तीला मानसिक शक्तीची जोड मिळेल. स्वभावातील तडफदारपणामुळे सभेत यश मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रातील विषयांवर दीर्घ चिंतन कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारी वर्गाला मोठय़ा मनाने मदत कराल. जोडीदार आपल्या व्यस्त वेळापत्रकातूनही कुटुंबासाठी वेळ राखून ठेवेल. वायुप्रदूषणापासून स्वत:चे संरक्षण करा. घरगुती उपचार उपयोगी पडतील.

वृषभ शुक्र-चंद्राच्या समसप्तम योगामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघाल. अडचणींवर मात करून पुढील मार्ग अवलंबाल. नोकरी-व्यवसायात कामाचा उत्साह वाढेल. वरिष्ठांसह वैचारिक देवाणघेवाण होईल. सहकारीवर्गाला देखील या चच्रेचा लाभ होईल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. सुखी जीवनाचा अनुभव घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. ज्येष्ठ व्यक्तींचा मौलिक सल्ला मिळेल. घसा व डोळे सांभाळा. पथ्य पाळा.

मिथुन बुध-शनीच्या प्रतियोगामुळे व्यवहारी, परंतु विचारी धोरण स्वीकाराल. बुधाच्या चंचलतेला शनीच्या प्रगल्भतेचा लगाम बसेल. नोकरी-व्यवसायात सांघिक कामापेक्षा स्वतंत्र विचारांनी काम पूर्ण कराल. वरिष्ठांच्या पसंतीस उतराल. सहकारी वर्गाची मदत घेणे टाळाल. ध्यानीमनी नसताना बहीण-भावंडांच्या साहाय्यासाठी धावपळ करावी लागेल. जोडीदाराला आपल्या कार्यक्षेत्रातील अडचणींना सामोरे जावे लागेल. जोडीदाराला आधार द्याल. पित्तविकार संभवतात.

कर्क गुरू-बुधाच्या षडाष्टक योगाची फारशी अशुभ फळे मिळणार नाहीत. उलट हा योग बौद्धिक क्षेत्रात शुभ फलदायी ठरेल. नोकरी-व्यवसायात अचानक प्रवास घडेल. वरिष्ठ अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवतील. त्या काळजीपूर्वक पूर्ण करा. मीटिंगची वेळ पाळा. लेखन, करार, व्यवहार यात अडचणी येण्याची शक्यता दिसते. योग्य ती खबरदारी घ्यावी. जोडीदाराचे विचार समजून घेणे आवश्यक! कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मांडय़ा, सांधे जपावेत.

सिंह गुरू-मंगळाच्या षडाष्टक योगामुळे कामाचा उत्साह वाढेल. नेतृत्व उजळून निघेल. नोकरी-व्यवसायात दशमातील रवीमुळे अनेक कामे नुसता शब्द टाकताच पूर्ण होतील. सहकारी वर्ग हर प्रकारची मदत करेल. अडीअडचणीतून मार्ग काढाल. महत्त्वाकांक्षा बहरेल, परंतु टोकाची भूमिका नको. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील समस्येवर उपाय सुचवाल. याचा जोडीदाराला चांगला फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल.

कन्या दशमातील बुध-मंगळाच्या युती योगामुळे बुद्धीला धडाडीची जोड मिळेल. परंतु विचार न करता कृती करू नका. नोकरी-व्यवसायात नव्या कामाची जबाबदारी स्वीकाराल. सहकारी वर्ग आपल्याकडून मदतीची अपेक्षा करेल. कौटुंबिक वातावरणातील तणाव दूर करण्यासाठी जोडीदार सर्वतोपरी साहाय्य करेल. डोकेदुखीवर औषधोपचार करावा.

तूळ चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे एकंदरीत उत्साह वाढेल. कामाच्या धावपळीत आपले आवडते छंदही जोपासाल. सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घ्याल. नोकरी-व्यवसायात नव्या योजना वरिष्ठांपुढे मांडाल. सहकारी वर्ग याला पाठबळ देईल. जोडीदाराला समजून घ्या. आपले प्रेम शब्दांतून व्यक्त होऊ द्या. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कुटुंबासह प्रवास योग संभवतो. उत्सर्जन संस्थेचे आरोग्य सांभाळा. घरगुती उपाय वा वैद्यकीय उपचार घ्यावेत.

वृश्चिक चंद्र-शुक्राच्या समसप्तम योगामुळे कलात्मक दृष्टिकोनाला जोड मिळेल. नव्या संकल्पना जन्माला येतील. कला क्षेत्रातील नोकरी-व्यवसायात विशेष प्रगती कराल. वरिष्ठांची मर्जी संपादन करणे कठीण जाईल. सहकारी वर्गाच्या समस्यांवर उपाय शोधाल. परंतु त्याच्या अंमलबजावणीत विलंब होईल. जोडीदाराला आपले मत समजावून सांगाल. त्याच्याशी चांगले सूर जुळतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नातेवाईकांसाठी थोडी धावपळ करावी लागेल.

धनू बुध-नेप्च्यूनच्या नवपंचम योगामुळे बौद्धिक व मानसिक बळ वाढेल. सूचक स्वप्ने पडतील. कलेचे सादरीकरण उत्तम प्रकारे कराल. नोकरी-व्यवसायात प्रकल्पाचे नेतेपद स्वीकाराल. नावीन्याची झलक दाखवाल. सहकारी वर्ग मदतीसाठी तत्पर असेल. जोडीदारासह वैचारिक मतभेद होतील. पेल्यातील वादळ पेल्यातच शमवा. कुटुंब सदस्याच्या आरोग्यासाठी वेळ व पसा बाजूला ठेवावा लागेल. घसा व डोळ्याचे आरोग्य सांभाळा. चिंता नसावी.

मकर गुरू-नेप्च्यूनच्या केंद्र योगामुळे संशोधन क्षेत्रात प्रगती होईल. धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात मन रमेल. धार्मिक यात्रा कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. सहकारी वर्ग आपल्या सूचनांचे पालन करेल. जोडीदारासह झालेल्या वादविवादात आपण नमती बाजू स्वीकाराल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवणे आपल्याच हातात आहे. मंगळ-शनीच्या प्रतियोगामुळे ज्वर येणे, पडणे झडणे, मार लागणे यापासून सावधान!

कुंभ शनी-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे कष्टाची तयारी ठेवाल. विवेकी व संयमी वृत्तीला जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या साहाय्याने  एखाद्या सामाजिक संस्थेचे काम कराल. सहकारी वर्ग या कामात आपली मदत करेल. जोडीदार आपल्या कुटुंबासाठी, घरासाठी खूप कष्ट करेल. त्याच्या या योगदानाची वाखाणणी कराल. मानसिक समाधान मिळेल. शारिरीक दगदग होईल. लहान-मोठी दुखणी अंगावर काढू नका. त्वरित औषधोपचार  घ्यावा.

मीन गुरू-बुधाच्या षडाष्टक योगामुळे महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये काही मुद्दय़ांचा उल्लेख करणे राहून जाईल. हे टाळण्यासाठी  आधीपासूनच खबरदारी घ्यावी. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. सहकारी वर्गाच्या हितासाठी पावले उचलाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. खांदे व स्नायू जपा. गरज पडल्यास वैद्यकीय मदत घ्या.