01vijay1मेष वातावरणात थोडासा जरी बदल मिळाला तरी तुम्ही ताजेतवाने होता, हा आनंद तुम्ही घ्याल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता एखादे वेगळे आमिष दाखवावे लागेल. २०१६ सालच्या सुरुवातीला ग्रहस्थिती बरी होती; पण नंतर गुरू आणि शनी या दोन्ही ग्रहांनी तुमच्याविरुद्ध बंड पुकारल्यामुळे सर्वच गोष्टी कठीण झाल्या आहेत. पुढील वर्षांत प्रवेश करताना हिंमत न हारता तुम्हाला नेटाने उभे राहावे लागेल.

वृषभ योग्य वेळी केलेली कृती आणि उत्तम नियोजन यामुळे आठवडय़ातील तुमचे यश द्विगुणित होणार आहे. व्यापार-उद्योगात एखादे नवीन काम सुरू केले असेल तर त्याला गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये एखादी गोष्ट मनाप्रमाणे होईल. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तींशी हितगुज करता येईल. काहींना लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. २०१६ सालची सुरुवात खडतर झाली; पण २०१७ सालात प्रवेश करताना तुम्ही आनंदी व उत्साही दिसाल.

मिथुन गेल्या दोन-तीन महिन्यांत असलेली ग्रहस्थिती आता सुधारल्याने तुम्हाला बरे वाटेल. अनेक गोष्टी करण्याचा तुमचा इरादा असेल. व्यापार-उद्योगात नवीन वर्षांकरिता काही बेत आखून ठेवाल; पण ते यशस्वी करण्याकरिता बरीच मेहनत करावी लागेल. नोकरीत नवीन कामाचे सूतोवाच होईल. घरामध्ये थोडय़ाशा वादविवादानंतर काही छान बेत निश्चित होतील. २०१७ सालात प्रवेश करताना उसने अवसान आणून काम करायला लागणार आहे, हे लक्षात ठेवा.

कर्क प्रत्येक गोष्ट मिळविण्याकरिता या आठवडय़ात तुम्हाला सतर्क राहिले पाहिजे. त्यामध्ये थोडा आळस झाला तरी चालणार नाही. व्यापार-उद्योगात स्वत:ची मर्यादा लक्षात घेऊन काम करा. नोकरीमध्ये तुमच्या चांगुलपणाचा सर्व जण गरफायदा घेतील. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधणे कठीण आहे हे लक्षात आल्याने तुम्ही मौजमजा करायचे ठरवाल. २०१६ सालात ग्रहांची तुम्हाला चांगली साथ मिळाली तशीच साथ पुढल्या वर्षांत मिळणार आहे.

सिंह काम कोणतेही असो, एकदा ते तुमच्या हातात आले, की तुम्ही त्याचा फडशा पाडता. या आठवडय़ात तुमचा हा गुण नोकरी, व्यवसाय आणि घरकाम या तीनही आघाडय़ांवर विशेष रूपाने दिसून येईल. कामाच्या वेळी काम करून फावल्या वेळात जीवनाचा मनमुराद आनंद घ्यायचे तुम्ही ठरवाल. २०१६ सालाच्या सुरुवातीला तुमची ग्रहस्थिती फारशी उत्तम नव्हती. नवीन वर्षांत प्रवेश करताना तुमचा दृष्टिकोन आनंदी ठेवा.

कन्या नित्यकर्माचा तुम्हाला मनस्वी कंटाळा येईल. व्यापार-उद्योगात ज्या कामात कष्ट कमी आणि प्राप्ती जास्त असेल अशा कामांना प्राधान्य द्याल. नोकरीत प्रत्येक कामात शॉर्टकट घेण्याचा तुमचा विचार असेल. घरामध्ये तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. एखादे शुभकार्य पार पडेल. २०१६ सालामध्ये ग्रहमान थोडेसे खडतर होते; पण ऑगस्टमध्ये त्यामध्ये सुधारणा झाल्यावर तुमची इच्छा-आकांक्षा सुधारत गेली. नवीन वर्षांत प्रवेश करताना तुम्ही उत्साही दिसाल.

तूळ एखाद्या अवघड कामात तुमची कल्पकता आणि हुशारी दोन्ही उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगात रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यासाठी धक्कास्टार्ट या पद्धतीने काम करावे लागेल. जुन्या ओळखींचा आणि पूर्वी केलेल्या कामांचा उपयोग होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा वेग उत्तम राहील. काही अवघड कामांत तुम्हाला अचानक शॉर्टकट मिळेल.  नवीन वर्षांत ग्रहांची फारशी साथ मिळणार नाही. त्यामुळे प्रयत्नांती परमेश्वर.

वृश्चिक ग्रहमान तुमचा उत्साह वाढविणारे आहे. तुमच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांना वाव मिळेल. व्यापार-उद्योगात एखादी जुनी वसुली करण्याकरिता नवीन युक्तींचा अवलंब कराल.  नोकरीमध्ये विशिष्ट कामगिरीकरिता तुम्हाला जादा अधिकार दिले जातील. घरामध्ये तुमच्या स्पष्ट बोलण्याचा इतरांना राग येईल; पण ते उपयोगी पडेल. नवीन वर्षांत प्रवेश करताना शनीमुळे जरी त्रास झाला तरी गुरूची तुम्हाला चांगली साथ मिळणार आहे.

धनू ग्रहमान तुमच्या बिनधास्त स्वभावाला खतपाणी घालणारे आहे. ज्या कामात तुम्ही लक्ष घालाल त्यामध्ये ठरविलेले उद्दिष्ट पार पाडाल. व्यापार-उद्योगात नवीन वर्षांकरिता काही नवीन योजना तुमच्या मनात घोळत राहतील. घरामध्ये शुभसमारंभात तुम्ही उत्सवमूर्ती बनाल. छोटय़ा ट्रिपमुळे ताजेतवाने व्हाल. २०१७ सालात प्रवेश करताना तुमच्यापुढे अनेक भव्यदिव्य स्वप्ने असतील. ती कशी पूर्ण करायची या विचारात तुम्ही असाल.

मकर प्रत्येक कामात आपल्याला चांगले यश मिळाले पाहिजे याकरिता प्रयत्नशील राहाल. व्यापार-उद्योगात कमाई चांगली असेल. नवीन वर्षांकरिता एखादा नवीन प्रोजेक्ट तुमच्या मनामध्ये असेल. नोकरीच्या ठिकाणी नेहमीपेक्षा थोडीशी जास्त पगारवाढ होण्याचा संकेत मिळेल. तुमच्या कामाच्या स्वरूपात थोडेफार फेरफार होतील. घरातील वातावरण आनंदी व उत्साही असेल. २०१७ सालात प्रवेश करताना तुम्ही प्रत्येक संधीचा चांगला फायदा घ्यायचे ठरवाल.

कुंभ ग्रहमान तुमच्या मार्मिक स्वभावाला खतपाणी घालणारे आहे. कामाच्या वेळी काम करायचे आणि इतर वेळेला जीवनाचा भरपूर आस्वाद घ्यायचा असे तुम्ही ठरवाल. व्यापार-उद्योगात आíथक बाजू समाधानकारक राहील. नोकरीच्या ठिकाणी  कितीही काम केले तरी थकवा जाणवणार नाही. कला-क्रीडा यात मन रमेल.  नवीन वर्षांत प्रवेश करताना तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला थोडीशी झळ पोहोचणार आहे हे लक्षात घ्या.

मीन जी कामे सहज, सोपी वाटतात त्यामध्ये प्रत्यक्षात बराच वेळ जाईल; पण तुम्ही जिद्दीने ती पूर्ण कराल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना पटविण्यासाठी एखादी नवीन युक्ती शोधाल. नोकरीमध्ये कठीण काम मार्गी लावाल. वरिष्ठ त्याचे कौतुक करतील. घरामध्ये तुमचा राग, लोभ, प्रेम इत्यादीचे सर्वाना दर्शन होईल. २०१७ सालात प्रवेश करताना तुम्ही प्रचंड आनंदी व उत्साही दिसता. इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याकरिता काहीही करण्याची तुमची तयारी असेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com