18 February 2019

News Flash

भविष्य : दि. २५ ते ३१ मे २०१८

शक्तीला जेव्हा युक्तीची जोड मिळते त्या वेळी काही विस्मयजनक गोष्टी घडू शकतात.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष शक्तीला जेव्हा युक्तीची जोड मिळते त्या वेळी काही विस्मयजनक गोष्टी घडू शकतात. तसा अनुभव सभोवतालच्या व्यक्तींना तुमच्या बाबतीत येईल. व्यापार-उद्योगात पूर्वी ज्या संधींनी तुमच्याकडे पाठ फिरवली होती त्या संधी आता पुन्हा तुमच्याकडे चालून येतील. नोकरीच्या ठिकाणी खास कामगिरीकरिता तुमची निवड होईल.  घरामध्ये तुमच्या धाडसी स्वभावाचा इतर सदस्य फायदा उठवतील.

वृषभ ग्रहस्थिती जरी फारशी उत्साहवर्धक नसली तरी तुम्ही थांबून न राहता प्रत्येक प्रश्नावर एखादा चांगला तोडगा शोधून काढाल. व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने संपूर्ण आठवडा दगदग आणि धावपळीचा ठरणार आहे. जोडधंदा असणाऱ्यांना एखादे छोटे-मोठे काम मिळेल. नोकरदार व्यक्तींना जे काम आवडत नाही ते सांगून वरिष्ठ जणू काही संयमाची परीक्षा पाहतील. त्यातून ते सहीसलामत बाहेर पडतील. घरामध्ये इतरांना सल्ला द्याल.

मिथुन कधी कधी प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला जे चांगले-वाईट अनुभव येतात त्यातून आपल्याला काही तरी शिकायला मिळते आणि त्याचा व्यावहारिक जीवनात उपयोग होतो, असा अनुभव देणारा आठवडा आहे. व्यपार-उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका. कारखानदारांना महागडे तंत्रज्ञान स्वीकारून स्पध्रेत टिकून राहावे लागले. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे विचार व कामाची पद्धत पटणार नाही.

कर्क स्वप्न आणि सत्य हे वेगवेगळे असते. स्वभावत: तुमची रास खूप संवेदनशील आहे. स्वप्ने पूर्ण करण्याआधी सत्याला तोंड द्यावे लागेल. व्यापार-उद्योगात भावनेच्या भरात चुकीच्या व्यक्तीशी पशाचे व्यवहार करू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या चांगुलपणाचा गरफायदा घेतील. घरामध्ये एखाद्या समारंभामध्ये सर्वजण तुम्हाला गृहीत धरतील. लांबच्या नातेवाईकांना भेटण्याचा योग संभवतो.

सिंह स्वार्थ आणि परमार्थ साधण्यामध्ये या आठवडय़ात तुम्ही यशस्वी व्हाल. करिअरमध्ये तुमची उद्योगप्रियता दिसून येईल, पण सामाजिक कामात मात्र तुम्ही तुमचे औदार्य दाखवाल. व्यापार-उद्योगात जे काम कराल त्याचा दर्जा उत्तम असेल.  चालू नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या शब्दाला मान देतील. घरामध्ये जी गोष्ट ज्याला आवडते ती देण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. आपुलकीच्या व्यक्तीकडून एखादी चांगली बातमी कळेल.

कन्या तुमची रास व्यवहारी स्वभावाची आहे. देवधर्म, पूजा-अर्चा वगरे गोष्टींना तुम्ही जास्त महत्त्व देत नाही, पण या आठवडय़ामध्ये तुम्ही या दोन्ही गोष्टींना सारखेच महत्त्व द्याल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामातून वसुली झाल्यामुळे बरे वाटेल. सप्ताहाच्या मध्यात तातडीच्या कामाकरिता छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी टीमवर्कला महत्त्व दिल्यामुळे अवघड कामात तुम्ही सफल व्हाल.

तूळ ग्रहमान तुमची इच्छापूर्ती करणारे आहे. कधीकधी पशापेक्षा आपल्याला स्वत:ची प्रतिष्ठा आणि स्तुती महत्त्वाची वाटते. या आठवडय़ात या दोन्ही गोष्टी तुमच्या वाटय़ाला येतील. व्यापार-उद्योगात तुम्ही केलेले काम गिऱ्हाईकांना आवडेल. त्यांच्याकडून नवीन ऑर्डर मिळण्याचे आश्वासन मिळेल. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी केलेल्या कामाचा उपयोग झाल्याने तुमचा कामाचा झपाटा चांगला राहील. घरामध्ये तुम्हाला बराच भाव येईल.

वृश्चिक परिस्थिती आटोक्यात आणण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. हे काम जरी कष्टदायक असले तरी त्यामध्ये तुम्ही माघार घेणार नाही. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता एखादे महागडे तंत्र वापरावे लागेल. नवीन प्रोजेक्टच्या बाबतीत तुमचे विचार थोडेसे सावध असू द्या. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही स्वत: केलेल्या कामाची टिमकी मिरवाल. घरामध्ये एखादा खर्चीक बेत सर्वानुमते पार पडेल.

धनू शरीर आणि मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या आठवडय़ात तुम्ही जर तब्येत सांभाळली तर भरपूर काम करू शकाल. कोणतेही सामूहिक काम असले की, सभोवतालच्या व्यक्तींना ताबडतोब मदत करता. तुमच्या या स्वभावामुळे ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्ही सर्वाना हवेहवेसे वाटाल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात आणि शेवट तुम्हाला लाभदायक ठरेल.

मकर ग्रहमान तुमचा उत्साह वाढविणारे आहे. एखाद्या किचकट कामामध्ये तुम्ही शक्ती आणि युक्ती या दोन्हींचा वापर करून ते काम तडीस न्याल. त्याचा आंतरिक आनंद तुम्हाला लाभेल. व्यापार-उद्योगात कामकाज चांगले होईल. नव्याने सुरू केलेल्या प्रोजेक्टमध्ये गती येईल. आठवडय़ाचा मध्य लाभदायक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी काम सांगायच्या आधीच तुम्ही ते तयार ठेवाल. घरामध्ये एखादा सोहळा पार पडेल.

कुंभ केलेले काम कधी वाया जात नाही याचा प्रत्यय देणारे हे सर्व ग्रहमान आहे. व्यापार-उद्योगात नवीन व्यक्तींशी होणारी ओळख एखादे नवीन दालन खुले करेल, पण गुंतवणूक एकदम न करता टप्प्याटप्प्याने करा. जोडधंदा असेल तर त्यातून तुम्हाला पसे मिळतील. नोकरीच्या जागी तुमची सचोटी आणि कौशल्य याचे वरिष्ठ कौतुक करतील. तुम्हाला मूठभर मांस चढल्यासारखे वाटेल. घरामधील मंगल कार्याला हजेरी लागेल.

मीन शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे दाखवून देणारा हा आठवडा आहे. जे काम तुमच्या मनामध्ये आहे, ते पूर्ण करण्याकरिता तुम्ही संबंधित व्यक्तींना खूश ठेवण्याचा प्रयत्न कराल. व्यापार-उद्योगात एखाद्या नवीन करारावर सह्य़ा होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या आवडीचे काम मिळाल्याने जरी कष्ट असले तरी तुम्ही त्याचा जास्त विचार करणार नाही.

First Published on May 25, 2018 1:01 am

Web Title: astrology 25th may to 31st may 2018