News Flash

३ ते ९ फेब्रुवारी २०१७

ग्रहमान झपाटय़ाने तुम्हाला अनुकूल होत आहे.

मेष ग्रहमान झपाटय़ाने तुम्हाला अनुकूल होत आहे. ज्या इच्छा-आकांशा तुम्ही मनामध्ये दडपून टाकल्या होत्या त्यांना आता योग्य संधी मिळेल.  व्यापार उद्योगात स्पर्धा तीव्र होईल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून मदतीचा पाठिंबा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम वाया गेले असे वाटत होते त्याचा  उपयोग होईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये लांबलेल्या प्रश्नावर मार्ग मिळाल्याने सर्वाना हायसे वाटेल.

वृषभ कधी कधी जे काम पसे करू शकत नाही ते काम माणसांनी जोडलेल्या हितसंबंधांमुळे पार पडू शकते. या आठवडय़ात तुम्हाला याची प्रचीती येईल. व्यापारउद्योगाच्या क्षेत्रात स्पर्धकांच्या गोटामध्ये काय चालले आहे याचा अंदाज घेतलात तर तुम्हाला तुमचा पवित्रा आणि कामाची पद्धत ठरवणे शक्य होईल. नोकरीच्या ठिकाणी एखादे अवघड काम नियंत्रणात आल्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल. वरिष्ठ विश्वासाने एखादे काम तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये कोणत्याही प्रश्नावर सर्वाना मान्य असणारा तोडगा शोधा.

मिथुन जी कामे पूर्वी तुम्ही लांबवलेली होती त्यामध्ये धीराने लक्ष घालायचे ठरवाल. व्यापार-उद्योगामध्ये ज्यांनी तुम्हाला पूर्वी नकारघंटा ऐकवली होती त्यांच्याकडून आता थोडीफार मदत करण्याची तयारी दर्शवली जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची आणि मदतीची इतरांना गरज असल्यामुळे तुमची बडदास्त नाइलाजाने ठेवली जाईल. कामाचा तणाव वाढल्यामुळे घडय़ाळाच्या काटय़ानुसार काम करावे लागेल. घरामध्ये एक प्रकारचा तणाव राहील. त्यामुळे थोडी चिडचिड होईल.

कर्क तुमचा स्वभाव असा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी तुमच्या आनंदी वृत्तीमुळे एक मित्रत्वाचे नाते निर्माण करता. त्याचा तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर उपयोग होतो. व्यापारउद्योगात बाजारातील परिस्थिती अनुकूल होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी पूर्वी जर काही आश्वासन दिले असेल तर त्याची पूर्तता होईल. बदली हवी असेल तर हळूहळू प्रयत्न सुरू करा. घरामध्ये एखादे शुभकार्य ठरविण्यात तुमची मध्यस्थी इतरांना उपयोगी पडेल.

सिंह पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण करून देणारे हे ग्रहमान आहे. जे काम गेल्या आठवडय़ात वाया गेले असे वाटत होते त्याचा उपयोग झाल्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल. व्यापार-उद्योगात आíथक व्यवहारात स्वत: जातीने लक्ष घाला. इतरांवर अवलंबून राहू नका. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त एखादे वेगळे काम करावे लागेल. भविष्यात त्याचा उपयोग होईल. घरामध्ये सर्वाना खूश ठेवाल.

कन्या सर्व ग्रहस्थिती तुम्हाला एखादे चांगले काम करायला प्रवृत्त करेल. त्याचा भविष्यात बराच उपयोग होईल. व्यापार-उद्योगात आपल्या हातून चांगले काम व्हावे असा तुमचा आग्रह असेल. मिळणारे पसे खर्च करावेसे वाटणार नाही. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना काय पाहिजे हे जाणून घेऊन त्याच कामाला महत्त्व द्या. वरिष्ठ खूश होऊन तुम्हाला एखादे आश्वासन देतील. घरामध्ये ज्या मंगलकार्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहात होता ते ठरल्यामुळे सर्वाना बरे वाटेल. मुलांच्या गरजेनुसार तुमच्या दिनक्रमात तुम्ही बदल कराल.

तूळ कोणत्याही कामामध्ये जास्त गडबड झाली की तुमच्या हातून चुका होतात. ते टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने काम कराल. त्यामुळे कामाचा दर्जा चांगला राहील. व्यापार-उद्योगात  आळस न करता एखाद्या नवीन प्रोजेक्टचे नियोजन कराल. त्यामध्ये एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे तुम्हाला साहाय्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वेळेमध्ये आणि संस्थेच्या गरजेनुसार काम करण्यावर भर राहील. सहकाऱ्यांनी तुमच्या कामात लुडबुड केलेली चालणार नाही. घरामध्ये छोटेमोठे बदल करावेसे वाटतील.

वृश्चिक तुमच्या राशीमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता आहे. जशी गरज असते त्याप्रमाणे तुम्ही त्याचा उपयोग करता. या आठवडय़ात हे दोन्ही गुण तुम्ही युक्तीने अवलंबाल. व्यापार-उद्योगात योग्य व्यक्तींशी गाठभेट झाल्यामुळे अनेक कामांना गती मिळायला सुरुवात होईल. नोकरीमध्ये जे काम इतरांना जमले नव्हते ते तुम्ही पूर्ण करून दाखवाल. बेकार व्यक्तींना मुलाखतीत यश मिळेल. घरामध्ये प्रत्येकाची गरज ओळखून तुम्ही त्यानुसार वागाल. तुमचे कौतुक होईल.

धनू एकंदरीत ग्रहस्थिती कष्टदायक, पण तुम्हाला लाभादायक ठरणारी आहे. ज्या प्रमाणामध्ये तुम्ही कष्ट कराल त्या प्रमाणामध्ये तुम्हाला धनप्राप्ती होईल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेले एखादे काम उपयोगी पडेल. तुमच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून मदतीचे आश्वासन मिळेल. नोकरीमध्ये एखादे काम लांबले असेल तर त्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल. घरामधल्या लहान-मोठय़ा गोष्टींमध्ये जास्तच लक्ष घालाल.

मकर ग्रहमान तुमच्या उद्योगी स्वभावाला खतपाणी घालणारे आहे. जे काम तुम्ही हातात घ्याल. त्याचा फडशा पाडाल, व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचा फायदा होईल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख झाल्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची तुम्हाला संधी मिळेल. काही जणांना लांबचा प्रवास घडेल. घरामध्ये प्रत्येक कामात तुमचा पुढाकार असेल. थोडे पसे खर्च करून छोटय़ा-मोठय़ा सुधारणा कराल. सगळ्यांसोबत वेळ मजेत घालवाल.

कुंभ कष्टाशिवाय काही मिळत नाही हे सिद्ध करणारे आठवडय़ाचे ग्रहमान आहे. सहज आणि सोपी वाटलेल्या कामात आयत्या वेळेला बरीच धावपळ करावी लागेल. व्यापार-उद्योगात केलेल्या कामाचे पसे मिळतील. तुमची गरज जास्त असल्यामुळे तात्पुरते कर्ज काढावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखादे आमिष दाखवून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. त्याचा तुम्हाला राग येईल, पण नाइलाज असेल. घरामध्ये लहान व्यक्तींच्या गरजा भागवाव्या लागतील.

मीन सभोवताली जेव्हा आपुलकीची माणसे असतात त्या वेळी तुम्ही एकदम खूश असता. अशा वेळी इतर कोणत्याही गोष्टीची आठवण येत नाही. या आठवडय़ात असा छान अनुभव तुम्हाला येईल. व्यापार-उद्योगात केलेल्या कामाचा मोबदला लगेच मिळाल्याने तुम्ही खूश असाल. एखादे नवीन काम मिळाल्याने तुम्हाला बरे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी ताणतणाव कमी होईल. घरामध्ये एखादी चांगली बातमी कळेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 1:02 am

Web Title: astrology 3 to 9 february 2017
Next Stories
1 २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१७
2 दि. २० ते २६ जानेवारी २०१७
3 दि. १३ ते १९ जानेवारी २०१७
Just Now!
X