मेष तुमच्या सभोवतालच्या व्यक्तींचा चेहरा आणि मुखवटा यातील भेद लक्षात येईल. व्यापार-उद्योगातील महत्त्वाची बोलणी शक्यतो या आठवडय़ात करू नका. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुम्ही इतरांवर सोपवले होते ते व्यवस्थित पार पडणार नाही. घरामध्ये एखादा कार्यक्रम पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसमवेत छोटे-मोठे वाद होतील. प्रवासामध्ये स्वत:ची चीजवस्तू सांभाळा.

वृषभ या आठवडय़ामध्ये सर्व आघाडय़ांवर तुमच्या संयमाची परीक्षा होणार आहे. ज्या प्रश्नाविषयी मनामध्ये धाकधूक होती तो प्रश्न आता समोर येऊन उभा राहील. कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. व्यापार-उद्योगात तुमच्या हातून पूर्वी काही चूक झाली असेल तर त्याची नुकसानभरपाई करावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामात काटेकोर राहा. घरामधल्या वादात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका.

मिथुन ‘दिसते तसे नसते म्हणून जग फसते’ याची आठवण करून देणारे हे ग्रहमान आहे. एखाद्या निमित्ताने तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या तुमच्या जवळची आणि तुमच्या लांबची शत्रू असणारी व्यक्ती तुम्हाला या आठवडय़ात कळेल. व्यापारउद्योगातील नवीन कामासंबंधी बोलणी करा,  नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर अतिविश्वास ठेवून तुमचे काम लांबवू नका. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा सल्ला तुम्हाला पटणार नाही.

कर्क तुमच्या राशीमध्ये उत्तम संघटनशक्ती आहे. त्याची या आठवडय़ात परीक्षा होईल. तुमचे करियर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्हाला मान मोडून काम करावे लागेल. व्यापारउद्योगात स्पर्धकांच्या हालचालींकडे लक्ष ठेवा. नोकरीच्या ठिकाणी सहकारी त्यांच्या मतलबाकरिता तुमच्याशी गोड बोलतील. तुमच्या पश्चात वरिष्ठांकडे कागाळ्या करतील. घरामध्ये तुमची इच्छा नसतानाही एखादा वादविवाद होईल.

सिंह दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवर वेगवेगळे अनुभव देणारा हा आठवडा आहे. करियरमधील प्रश्न हिकमतीने सोडवून दाखवाल, पण घरातील  प्रश्नावर मात्र तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे तुमची बरीच धावपळ होईल. अपेक्षित पसे लांबतील. नोकरीच्या ठिकाणी जे काम पूर्वी तुम्ही टाळले होते ते काम करावे लागेल. नवीन नोकरीच्या कामात थोडा विलंब संभवतो. घरामध्ये जुने प्रश्न नव्याने डोके वर काढतील.

कन्या ग्रहस्थिती तुम्हाला कोडय़ात टाकणारी आहे. करीयरमध्ये तुम्हाला खूप काम केल्यासारखे वाटेल. परंतु घरामधल्या जबाबदाऱ्या अचानक वाढल्यामुळे तुम्हाला त्याकडेसुद्धा लक्ष द्यावे लागेल. अशावेळी जास्त विचार न करता जे जसे जमेल तसे करत राहा. व्यापारउद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता काही नवीन बेत आखून ठेवाल. घरामध्ये जुनी प्रॉपर्टी किंवा पूर्वी चिघळलेला प्रश्न डोके वर काढेल.

तूळ ग्रहमान थोडीशी धोक्याची सूचना देणारे आहे. कोणतीही गोष्ट गृहीत न धरता सत्य काय आहे हे तपासून पाहिल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नका. व्यापारउद्योगात महत्त्वाच्या करारावर सह्य़ा न करता त्यातील अटी आणि नियम समजून घ्या. नोकरीच्या ठिकाणी संस्थेमध्ये काय चालले आहे यावर तुमची बारीक नजर असू द्या. परंतु कोणाविषयी मतप्रदर्शन करू नका. घरामध्ये वादविवादाचे प्रसंग आल्यास दहा आकडे मोजा.

वृश्चिक अत्यंत कमी बोलणारी तुमची रास आहे. ज्या वेळेस गरज असते त्या वेळेलाच तुम्ही तुमचे विचार व्यक्त करता. या आठवडय़ामध्ये कोणाचा राग आला तरी शब्द हे शत्रू आहे याची आठवण ठेवा. व्यापारउद्योगात पशाच्या बाबतीत तुम्ही काटेकोर असाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना काही शब्द दिला असेल तर ते तुमच्याकडून काम करून घेतील. घरामध्ये एखादा जुना प्रश्न नव्याने डोके वर काढेल.

धनू या आठवडय़ात ज्यांनी तुम्हाला मदत करायचे आश्वासन दिले होते त्यांनी शब्द फिरवल्यामुळे तुम्हाला त्रास होईल. व्यापारउद्योगात सबसे बडा रुपय्या असा अनुभव येईल. केवळ पशापोटी सर्व जण तुमच्याशी आपुलकीने वागतील. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या स्वरूपात बदल झाल्यामुळे तुम्ही कोडय़ात पडाल. घरामध्ये कोणाशीही वादविवाद घालू नका. अतिविचारामुळे प्रकृतीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.

मकर ग्रहमान तुम्हाला विशेष अनुकूल नाही. ज्या चुका तुम्ही पूर्वी केल्या होत्या त्यातून कदाचित तुमच्या कामाचा पवित्रा बदलावा लागेल. व्यापारउद्योगात ज्यांना तुम्ही पसे उधार दिले होते त्यांच्याकडून पसे लवकर न आल्याने तुमची धावपळ उडेल. नोकरीच्या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित चालले असून मनामध्ये एक प्रकारची असुरक्षिततेची भावना राहील. घरामध्ये कोणाशी तरी एखाद्या जुन्या प्रश्नावरून वादविवाद होतील.

कुंभ काही तरी मिळवायला काही तरी गमवावे लागते याचा अनुभव देणारे हे ग्रहमान आहे. तुमची रास बौद्धिक-दृष्टय़ा हुशार रास आहे. व्यापार-उद्योगात अनेक लांबलेली कामे आता मार्गी लागतील. अनोळखी व्यक्तींशी पशाचे व्यवहार करताना जपून. नोकरीच्या ठिकाणी जादा कमाईच्या हेतूने माहीत नसलेले काम स्वीकारू नका. घरामध्ये एखाद्या मुद्दय़ावरती सगळ्यांचे एकमत होण्यासाठी तुम्हाला विशेष कष्ट पडतील.

मीन कधी कधी एखाद्या कामाविषयी आपल्याला खूप विश्वास असतो. पण प्रत्यक्ष काम करायला लागल्यानंतर एक वेगळाच अनुभव येईल. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता काही बेत आखून ठेवले असतील तर ते गुप्त ठेवा. आठवडय़ाच्या मध्यानंतर एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा प्रसंगावरून तुमचा अहम दुखावला जाईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com