21 October 2018

News Flash

दि. ५ ते ११ जानेवारी २०१८

ग्रहमान तुमच्या उत्साही स्वभावाला पूरक आहे.

मेष ग्रहमान तुमच्या उत्साही स्वभावाला पूरक आहे. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती मिळविण्याकरिता तुम्ही कष्टाची तयारी ठेवा. व्यापारउद्योगात एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या शब्दाला मान देतील. अवघड कामगिरीकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये इतरांची तुमच्यावर भिस्त असेल. आठवडय़ाच्या  आठवडय़ाच्या शेवटी ठरविलेले काम काही कारणाने लांबण्याची शक्यता आहे.

वृषभ ‘बुडत्याला काडीचा आधार’ या नियमाप्रमाणे जी परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेलेली होती ती नियंत्रणात आणण्याकरिता तुम्ही प्रयत्न कराल. व्यापार-उद्योगात नवीन काम मिळवायला बरेच कष्ट पडतील. नोकरीच्या ठिकाणी एखादी अवघड जबाबदारी जिद्दीच्या जोरावर पूर्ण कराल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्यामुळे अवघड प्रश्नांची उकल होईल. सर्वाची मने सांभाळता सांभाळता तुमचे कष्ट वाढतील.

मिथुन आपण एखादी इच्छा मनामध्ये धरावी आणि त्याला अनुसरून चांगली घटना घडावी असा योगायोग या आठवडय़ात पाहायला मिळेल.  व्यापारउद्योगात ज्या व्यक्तींना तुम्हाला भेटायचे आहे त्यांच्याकडून संपर्क साधला जाईल. पण अनवधानाने सर्व गोष्टींना होकार देऊ नका. नोकरीमध्ये तुमच्यावर विश्वास ठेऊन वरिष्ठ तुमची जबाबदारी वाढवतील. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी थोडेसे अंतर ठेवून वागा.

कर्क दगडापेक्षा वीट मऊ असा अनुभव देणारे हे ग्रहमान आहे. सभोवतालची परिस्थिती बदलणार नाही. त्याची वाट न बघत बसता जे तुम्हाला करायचे आहे त्याची सुरुवात करा. व्यापारउद्योगात  जे काम तुम्ही इतरांवर सोपवाल त्यामध्ये काहीतरी गडबड गोंधळ होईल. नोकरीच्या ठिकाणी अवघड जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील ती पूर्ण करण्याकरिता सहकाऱ्यांच्या दाढीला हात लावावा लागेल. घरामध्ये जोडीदाराशी मतभेद होतील.

सिंह अनेक कल्पना एकाच वेळी डोक्यात असल्याने कोणत्या कामाला महत्त्व द्यावे असा तुमच्यापुढे प्रश्न असेल. आíथकदृष्टय़ा जे काम महत्त्वाचे आहे त्याला महत्त्व द्या. व्यापारउद्योगात बरीच कामे असल्यामुळे हाताखालच्या व्यक्तींवर अवलंबून राहावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुम्ही इतरांवर सोपवलेले आहे ते पुन्हा एकदा तपासून पहा. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.

कन्या आठवडय़ाची सुरुवात चांगली झाल्यामुळे तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारेल. शक्ती आणि युक्ती यांचा उपयोग करून मनाशी ठरविलेले उद्दिष्ट बऱ्यापकी पूर्ण होईल. व्यापारउद्योगात पूर्वी जे चांगले काम तुम्ही केलेले आहे त्याची गिऱ्हाईकांकडून स्तुती होईल. आíथक परिस्थिती चांगली असल्यामुळे तुमचा भाव वधारेल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये  वडिलोपार्जति इस्टेटीचे प्रश्न डोके वर काढतील.

तूळ आठवडय़ाच्या सुरुवातीला तुमच्या मनावर एक प्रकारचे दडपण असेल. अनेक नवीन कल्पना मनात तरळत असतील, पण त्यातल्या किती पूर्ण होतील याविषयी उगीचच शंका-कुशंका घ्याल. व्यापारउद्योगातील कामाचा दर्जा आणि वेग वाढविण्याकरिता तुम्हाला काही बदल करावेसे वाटतील. नोकरीच्या ठिकाणी एखादे वेगळे काम वरिष्ठ तुमच्यावर लादतील. त्यातूनच काहीतरी शिकायला मिळेल.

वृश्चिक अत्यंत निश्चयी स्वभावाची तुमची रास आहे. एखादी गोष्ट तुम्ही मनावर घेतली की त्यामध्ये कितीही अडथळे आले तरी ती गोष्ट पूर्ण करून टाकता. या आठवडय़ात या गुणाचा उपयोग होईल. व्यापारउद्योगात आठवडय़ाची सुरुवात आणि शेवट चांगल्या कामाने झाल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचे आंतरिक समाधान लाभेल. नोकरीच्या ठिकाणी योग्य कामांना महत्त्व देऊन तुम्ही ते काम वेळेत उरकाल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींची हजेरी लागेल.

धनू गेल्या आठवडय़ात तुम्हाला ज्या गोष्टी कठीण वाटल्या होत्या, त्यामध्ये गती आल्यामुळे तुम्ही आता आशावादी राहाल. व्यापारउद्योगात  नवीन हितसंबंध निर्माण होतील. त्यातून तुमच्या विचारांना वेगळी दिशा मिळेल. पण हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका. नोकरीमध्ये जे काम तुम्ही केले आहे त्याची वरिष्ठ दखल घेतील.  काही छोटय़ा-मोठय़ा सवलती पण देतील. बेकार व्यक्तींनी मिळेल ते काम स्वीकारावे.

मकर एखाद्या चांगल्या घटनेमुळे या आठवडय़ात तुम्ही उत्साही, आनंदी दिसाल. जे काम हातात घ्याल, ते पूर्ण करण्याची तुमची इच्छा असेल. व्यापारउद्योगात सध्याचे उत्पन्न चांगले असेल. त्यामध्ये वाढ करण्याकरिता एखादी नवीन योजना आखावीशी वाटेल. नोकरीमध्ये तुम्ही पूर्वी केलेले काम उपयोगी पडल्याने वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. त्यांच्याकडून तुम्ही एखादी सवलत मागून घ्याल. लांबच्या व्यक्तींना भेटण्याचे योग येतील.

कुंभ ग्रहमान तुम्हाला लाभदायक आहे. तुम्ही पूर्वी काही चांगले काम केले असेल तर त्याचे श्रेय तुम्हाला मिळेल. व्यापारउद्योगात चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त उत्पन्नात वाढ करण्यासाठी एखादा नवीन प्रोजेक्ट करून बघावासा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखादे आवडीचे काम तुमच्यावर सोपवतील. बेकार व्यक्तींना नवीन संधी उपलब्ध होईल. घरामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीचे आगमन होईल.

मीन काही गोष्टी अशा असतात की त्यातून आपल्याला पूर्वी केलेल्या कामाचा फायदा मिळतो. त्यामुळे जरी कष्ट पडले तरी त्याचे वाईट वाटत नाही. हा आठवडा यादृष्टीने चांगला आहे. व्यापारउद्योगात  नजिकच्या भविष्यामध्ये ज्या कामातून फायदा मिळणार आहे असे काम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखादे नवीन काम तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये एखादे शुभकार्य पार पडेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on January 5, 2018 1:02 am

Web Title: astrology 5 to 11 2018