01vijayमेष महत्त्वाच्या कामात दिरंगाई न करता आवश्यक ती कृती  तातडीने करणे आवश्यक आहे, नाही तर वेळ हातातून निघून जाईल. शक्ती-युक्तीचा योग्य वापर केला तर फायदा होईल. व्यापार-उद्योगात सुयोग्य व्यक्तीचा सल्ला आणि हितचिंतकाकडून मिळालेली मदत यामुळे मनोधर्य वाढेल. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादी तात्पुरती सवलत देऊन तुमच्याकडून जादा काम करून घेतील. घरामध्ये एखादा जुना प्रश्न नवे रूप धारण करण्याची शक्यता आहे.

वृषभ तुमच्या व्यवहारी स्वभावाला आता चांगली संधी मिळेल. त्याचे  सोने कराल. व्यापार-उद्योगात एखादे काम तांत्रिक कारणामुळे अडून राहिले असेल तर काही तरी तोडगा शोधून काढाल. सरकारी आणि कोर्ट कामांना गती येईल. नोकरीमध्ये वरिष्ठ मोठय़ा विश्वासाने तुमच्यावर जबाबदारी सोपवतील. तातडीच्या कामाकरिता प्रवास करावा लागेल. घरामध्ये जोडीदाराला तुमचा सल्ला पटणार नाही, पण नंतर तो योग्य होता असे तिला/ त्याला मान्य करावे लागेल.

मिथुन ग्रहांची चांगली साथ मिळाल्यामुळे काय करू आणि काय नको असे तुम्हाला झाले असेल. मात्र विनाकारण अति धोका पत्करू नका. व्यापार-उद्योगात काही योजना स्पर्धकांच्या भीतीने मागे ठेवल्या असतील तर त्याला पुन्हा एकदा चालना द्याल. जुनी वसुली झाल्याने पशाची आवक सुधारण्याची लक्षणे दिसू लागतील. नोकरीच्या ठिकाणी प्रतिस्पध्र्याच्या हालचाली तुमच्या लक्षात येतील. घरामध्ये वडिलोपार्जति इस्टेट किंवा नवीन जागेसंबंधी विचारविनिमय होईल.

कर्क ‘भगवान के घर देर है, अंधेर नहीं’ याची प्रचीती देणारे हे ग्रहमान आहे. ज्या कामात विनाकारण नाट लागलेली होती, त्यामध्ये प्रगती दिसू लागेल. व्यापारी वर्गाला छोटी-मोठी योजना बाजारात आणून गिऱ्हाइकांचे लक्ष वेधता येईल. त्याचा उलाढाल आणि फायद्यावर चांगला परिणाम दिसून येईल. नोकरीमध्ये एखादी विशेष सुविधा संस्थेकडून मिळेल. घरामध्ये बजेटबाहेर जाऊन पसे खर्च होतील, पण ते चांगल्या कारणाने असल्यामुळे एक प्रकारचे समाधान लाभेल.

सिंह वर्षांच्या सुरुवातीपासून ज्या बदलांचे वेध तुम्हाला लागलेले होते त्याचे नेमके स्वरूप कसे होते याचा आता अंदाज येईल. व्यवसाय-उद्योगात बाजारातील परिस्थितीनुसार धोरण सबुरीचे ठेवणे हितावह ठरेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची तोंडदेखली स्तुती करतील. तुमच्याकडून नेहमीपेक्षा जादा काम करून घेतील. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा दुरुस्त्या आणि डागडुजी करून ते सुधारण्याकरिता हातात पसे ठेवा. नातेवाईक आणि मित्रमंडळींची अचानक हजेरी लागेल.

कन्या जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे ती मिळविण्यासाठी तुमची बरेच कष्ट करण्याची तयारी असेल. त्यामध्ये कोणतीही कसूर झालेली तुम्हाला चालणार नाही. व्यापारातील नवीन योजनेकरिता पशाची गरज असेल तर त्याची व्यवस्था विविध मार्गाने होऊ शकेल. नोकरीमध्ये अवघड कामात एखादी शक्कल लढवून तुम्ही ते काम फत्ते कराल. संस्थेकडून तुम्हाला विशेष सवलत बहाल केली जाईल. घरामध्ये तुम्ही सुचविलेली कल्पना सगळ्यांना आवडेल.

तूळ ‘भगवान के घर देर है, अंधेर नहीं’ याची तुम्हाला आठवण येईल. जे काम तुम्ही पूर्वी केले होते पण समाधान मिळाले नव्हते त्या कामात आता यश मिळेल. व्यवसायात आíथकदृष्टय़ा लाभदायक काम नजरेच्या टप्प्यात आल्याने तुम्ही उत्साही बनाल. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते काम तुम्ही हाती घ्याल. घरामध्ये प्रत्येक कामात तुम्ही लक्ष घालाल. त्याचा इतरांना फायदा मिळेल.

वृश्चिक गेल्या दोन-तीन महिन्यांच्या अवधीत अडथळ्यांची मालिकाच जणू काही पूर्ण केली. यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दिसल्याने सुटकेचा नि:श्वास टाकाल. व्यापार-उद्योगात जे छोटे-मोठे बदल तुम्ही एक ते दीड महिन्यापूर्वी मनाशी आखले होते त्याची कार्यवाही दृष्टिक्षेपात येईल. नोकरीमध्ये कामाच्या स्वरूपात बदल पाहिजे असेल तर त्याकरिता काही तरी मार्ग निघेल. घरामध्ये एखाद्या सदस्याविषयी चिंता असेल तर ती कमी होईल.

धनू भाग्यस्थानातला गुरू तुमचे नतिक बळ वाढवणारा आहे.  व्यापार-उद्योगात मोहाचे काही क्षण निर्माण होतील. जास्त गुंतवणूक करून फायद्याचे प्रमाण वाढवावेसे वाटेल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका. नोकरीमध्ये ज्या कामाचा मनस्वी तिटकारा आहे ते काम करावे लागेल.  घरामध्ये एखादा अनपेक्षित प्रश्न उद्भवल्यामुळे त्याच्याकरिता तुम्हाला वेळ आणि पसे दोन्ही राखून ठेवावे लागतील.

मकर असे म्हणतात की, अनुभवातून माणूस शहाणा होतो. गेल्या काही महिन्यांत ज्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत त्यावरून आता तुमचे काही निश्चित निर्णय होतील. व्यापार-उद्योगात मोठी गुंतवणूक आवश्यक होऊन बसेल. पण फायद्या-तोटय़ाचे गणित अनुभवी व्यक्तींकडून समजून घ्या. नोकरीमध्ये तुमच्या कामाला महत्त्व आल्यामुळे वरिष्ठ तुमची मखलाशी करतील. त्यांच्याकडून एखादी मागणी पूर्ण करून घ्या. घरामध्ये प्रिय व्यक्तींचे हट्ट पुरवावे लागतील.

कुंभ कधी कधी तुमच्या मनामध्ये अफलातून कल्पना येतात. त्या जरी व्यावहारिकदृष्टय़ा योग्य नसल्या तरी तुम्ही मात्र त्याचा पाठलाग करता असा प्रकार या आठवडय़ात होईल. व्यापार-उद्योगात मोठय़ा खर्चाची नांदी होईल. विस्ताराकरिता आवश्यक असणारी गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या जागी बदली हवी असेल तर प्रयत्न करा. काही जणांना कामाच्या निमित्ताने लांबचा प्रवास घडेल. गरजांना प्राधान्य द्यावे लागेल.

मीन एखाद्या प्रश्नाने तुम्ही नाराज झाला असाल तर त्यावर आता चांगला मार्ग निघेल. तुमच्यातील आशावाद जागृत होईल. व्यापार-उद्योगात एखाद्या व्यक्तीअभावी किंवा कागदपत्राअभावी काम लांबले असेल तर तो प्रश्न आता सुटू शकेल. प्रतिष्ठित व्यक्ती आणि हितचिंतक तुम्हाला साथ देतील. बेकार व्यक्तींना काम मिळेल.  घरामध्ये अवघड प्रश्नावर सर्वानुमते चांगला मार्ग शोधून काढता येईल. लांबवलेले शुभकार्य ठरल्यामुळे सर्वाचा उत्साह ओसंडून वाहील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com