मेष तुमच्या मनामधले विचार आणि कृती यांचा समन्वय चांगला राहील. ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून होता त्यांच्याकडून सहकार्य न मिळाल्यामुळे पर्यायी विचार करावा लागेल. व्यवसाय उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरता जुन्या पद्धतींना रामराम ठोकून नवीन पद्धत स्वीकारण्याची तयारी ठेवा. एखाद्या जुन्या सहकाऱ्यांशी ताटातूट होईल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींची अनुपस्थिती जाणवेल.

वृषभ इतरांकडून तुम्ही मदतीची बरीच अपेक्षा ठेवाल, पण त्यांच्याकडून साथ न मिळाल्याने तुम्हाला स्वयंभू बनावे लागेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यात बराच वेळ जाईल. नवीन वर्षांकरिता एखादा खास बेत आखाल. नोकरीच्या ठिकाणी मान मोडून काम कराल. वरिष्ठ मात्र चुकांवर बोट ठेवतील. घरामध्ये तुमच्या अवतीभोवती बरीच माणसे असतील. तरीही तुम्हाला एकटे पडल्यासारखे वाटेल. थोडक्यात मोठय़ा ग्रहांनी तुमच्याविरुद्ध बंड पुकारले आहे. त्यामुळे तुमची अग्नीपरीक्षा सुरू झाली आहे.

मिथुन एखाद्या निमित्ताने आपले कोण आणि परके कोण यांची तुम्हाला परीक्षा होईल. व्यापार-उद्योगात बराच काळ चालू असलेले काम कमी होण्याचे तुम्हाला संकेत मिळतील. त्याऐवजी एखादे वेगळे काम करायला मिळेल. नोकरदार व्यक्तींनी शक्यतो सहकाऱ्यांवर अवलंबून राहू नये. त्यांच्या हातून एखादे चांगले काम पूर्ण झाल्याने वरिष्ठ खूश होतील. घरामध्ये छोटय़ाशा कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगळ्या लोकांच्या सहवासात तुम्ही याल. आपुलकीच्या व्यक्तींशी काही कारणाने दुरावा निर्माण होईल.

कर्क ग्रहयोग गृहसौख्याच्या दृष्टीने फारसे चांगले नसल्यामुळे तुम्हाला तुमचे मन कामात रमवावे लागेल. व्यापार उद्योगाच्या क्षेत्रात एखादी नवीन योजना तुमच्या मनात येईल. नोकरीच्या ठिकाणी एखादे अवघड काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. ते काम वेळेत पूर्ण करण्याकरिता तुम्हाला घराकडे दुर्लक्ष करावे लागेल. घरामध्ये पूर्वी ठरलेले बेत काही कारणाने बदलावे लागतील. आवडत्या व्यक्तींचा सहवास मिळणार नाही. आपल्या मर्यादेत राहून काम करा म्हणजे सर्व काही ठीक राहील.

सिंह तुमचा कामाचा उत्साह अपूर्व असेल. परंतु सर्व कामे एकटय़ाने करायला लागल्यामुळे एक प्रकारचा तणाव जाणवेल. व्यापार उद्योगात स्वत:ची लक्ष्मणरेषा न ओलांडू देता जमतील तेवढीच कामे करा. नोकरीच्या ठिकाणी ऐकावे जनाचे करावे मनाचे हा कानमंत्र लक्षात ठेवा. महत्त्वाची कामे लांबवू नका. घरामध्ये मौजमजेच्या वेळेला सर्वजण पुढे येतील, परंतु कामाच्या वेळी कोणीच नाही याचा अनुभव येईल.

कन्या आजकालच्या जगात पशाला खूप महत्त्व आहे हे खरे. पण कधी कधी त्यापेक्षा माणसांची मदत जास्त महत्त्वाची ठरते, याचा प्रत्यय देणारा हा आठवडा आहे. व्यापार उद्योगात योग्य व्यक्तींच्या गाठीभेटी झाल्याने रेंगाळलेल्या कामाला गती येईल.  नोकरीमध्ये तुम्ही पूर्वी दिलेला सल्ला वरिष्ठ आणि सहकाऱ्यांना उपयोगी पडेल. घरामध्ये एखाद्या व्यक्तीची अनुपस्थिती  अस्वस्थ करेल. नवीन वर्षांत प्रवेश करताना तुमच्यापुढे करियरमधले उद्दिष्ट मोठे असेल. घरातील काही प्रश्नांमुळे तुम्हाला तुमचे बेत निश्चित करता येणार नाहीत.

तूळ जे काम तुम्हाला आवडेल ते करण्याची तुमची मनापासून इच्छा असेल. पण आवश्यक त्या व्यक्तींची साथ मिळणार नाही. अखेर तुमची परिस्थिती एकला चलो रे अशी होईल. व्यापार उद्योगाच्या क्षेत्रात पसे चांगले मिळतील. भागीदाराच्या विचारांचा तुमच्यावर प्रभाव असेल. नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे काम वेळेत उरका. घरामध्ये ठरलेले कार्यक्रम काही कारणाने बदलतील. तुमचा वेळ कंटाळवाणा जाईल.

वृश्चिक तुम्हाला जीवनाचा आस्वाद घ्यावासा वाटेल, पण कर्तव्यामुळे थोडेसे जखडल्यासारखी परिस्थिती होईल. व्यापार उद्योगात जमाखर्चाची बाजू समसमान राहील. महत्त्वाची कामे नवीन वर्षांत लांबवाल. नोकरीत नेहमीच्या व्यक्ती आजुबाजूला नसल्याने कामात एकटेपणा वाटेल. घरामध्ये कामाच्या वेळी तुम्ही सर्वाना हवेहवेसे वाटाल. २०१७ सालात साडेसातीचा अवघड भाग संपला असला तरीही थोडय़ाशा चिंतेच्या मूडमध्ये तुम्ही २०१८ सालात प्रवेश कराल. बिनधास्त राहा.

धनू जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीची गरज असते त्यावेळेला तुम्ही खूश होता. पण काही द्यायची वेळ आली की त्या व्यक्तीला विसरून जाता. या आठवडय़ात ही गोष्ट टाळा. व्यापार उद्योगात जे पसे मिळतील त्यावर समाधान माना. नोकरीच्या ठिकाणी मौजमजेच्या वेळेला सर्व पुढे येतील. कामाच्या वेळी कोणी नाही असा अनुभव येईल. घरामध्ये एखाद्या व्यक्तीशी दुरावा निर्माण होईल.  साडेसातीचा मध्यभाग सुरू झालेला आहे.

मकर जी कामे जनसंपर्कावर आधारित होती त्या कामांना वेग मिळेल. तुमचा उत्साह वाढेल. व्यापार उद्योगात जुनी येणी वसूल होतील. नवीन वर्षांकरिता काही बेत आखाल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या आवडीचे काम मिळेल. घरामध्ये एखाद्या कामामध्ये तुम्ही पुढाकार घ्याल. सभोवतालच्या व्यक्ती मात्र तुमची स्तुती करून बघ्याची भूमिका घेतील. गुरू आणि शनी या दोन्ही ग्रहांनी तुम्हाला चांगली साथ दिली. त्यामुळे तुमचे इरादे बुलंद होते. नवीन वर्षांत गुरूशी साथ चांगली लाभणार आहे. साडेसाती असली तर घाबरू नका.

कुंभ या जगामध्ये कोणतीही गोष्ट कायमची टिकून राहणारी नसते, याची आठवण करून देणारा हा आठवडा आहे. तुमच्या सभोवतालचे वर्तुळ काही कारणाने बदलण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योगात जुने काम संपून नवीन काम सुरू होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये कामाच्या स्वरूपामध्ये बदल झाल्यामुळे तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल. घरामध्ये सर्व काही चांगले असेल. पण एखादी व्यक्ती लांब जाईल. नवीन वर्षांत प्रवेश करताना तुमचे ग्रहमान चांगले आहे.

मीन तुमच्या मनामध्ये सतत येणाऱ्या  नवीन कल्पना अमलात आणाव्या असे तुम्हाला वाटते. हा आठवडासुद्धा तसाच आहे. पण कोणत्या तरी गोष्टीची उणीव असल्यामुळे मन अस्वस्थ असेल. व्यापार उद्योगात तुम्ही भरपूर काम कराल. कामगारांची अनुपस्थिती थोडीशी त्रासदायक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ मोठय़ा विश्वासाने तुमच्यावर नवीन काम सोपवतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तींच्या मूडप्रमाणे वागावे लागेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com