18 October 2018

News Flash

दि. २४ ते ३० नोव्हेंबर २०१७

ग्रहमान थोडासा चकवा निर्माण करणारे आहे.

daily horoscope

मेष ग्रहमान थोडासा चकवा निर्माण करणारे आहे. आधी कृती आणि मग विचार या पद्धतीने काम करण्याचा मोह महागात पडेल. व्यापार-उद्योगात  नोकरीमध्ये तुमचे काम चांगले असेल, पण वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याकरिता त्यांच्या पुढे पुढे केलेत तर तुमची जबाबदारी वाढेल. त्यापेक्षा हातातले काम शांत चित्ताने आणि एकाग्रतेने करा. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा गोष्टींवर मोठे निष्कर्ष काढू नका. आलेल्या क्षणांचा पुरेपूर आनंद घ्या.

वृषभ या आठवडय़ामध्ये तुम्हाला तुमचे धोरण लवचीक ठेवावे लागेल. ज्या कामामध्ये बरीच गुंतागुंत झालेली आहे, त्यामध्ये शांतचित्ताने विचार करून सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडा. व्यवसाय-उद्योगामध्ये कामगारांच्या कलाने तुम्ही वागलात तर काही कामे सोपी होतील. त्यासाठी त्यांना आमिष दाखवावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्ही दिलेल्या सल्ल्याचा उपयोग करून घेतील. मात्र त्याचे श्रेय द्यायला तयार होणार नाहीत, अशा वेळी शांत राहा. घरामधल्या मोठय़ा व्यक्तींचे तंत्र सांभाळण्यासाठी तुमचे बेत बदलावे लागेल.

मिथुन ग्रहमान उलटसुलट आहे. तुमच्या दृष्टीने ज्या गोष्टी सहज आणि सोप्या असतील त्या थोडय़ाशा अवघड होतील. व्यवसाय-उद्योगात मध्यस्थांवर सोपवलेल्या कामांवर दुर्लक्ष होऊन चालणार नाही. पशाचे व्यवहार स्वत: हाताळा. नोकरीमध्ये कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यासंबंधी पूर्ण माहिती काढा. रामभरोसे निर्णय घेण्याचा मोह कटाक्षाने टाळा. एखादा जुना सहकारी अचानक भेटेल. घरामध्ये मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. नातेवाईक आणि आप्तेष्टांशी जपून वागा.

कर्क घरातील प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप संवेदनशील असता. त्यांना काय हवे, काय नको याची तुम्हाला सतत काळजी असते. व्यापार-उद्योगात एखादे तातडीचे काम हाताळण्याकरिता छोटा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी बाजारातील चढउतार, वरिष्ठांचा मूड दोन्ही बदलत राहिल्यामुळे तुमची धावपळ उडेल. घरामध्ये इतर वेळेला शांत असणारे तुम्ही एखाद्या प्रश्नावरून चिडून जाल. जागेसंबंधीच्या निर्णयात फेरबदल करावे लागतील.

सिंह तुमच्या उत्साही स्वभावाला पूरक ग्रहमान आहे, पण मधूनच भविष्याविषयी तुमच्या मनात चिंता निर्माण होईल. व्यापार-उद्योगात  महत्त्वाचे काम इतरांवर न सोपवता ते स्वत:च हाताळणे पसंत करावे. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांनी गिऱ्हाईकांना दिलेला शब्द पाळणे आवश्यक आहे. नोकरीत काम कमी कामाचा पसारा जास्त असा प्रकार आहे. घरामध्ये तुमच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होईल.

कन्या ज्या वेळी तुमच्या खिशात पसे खुळखुळत असतात त्या वेळी तुमचा मूड चांगला असतो. या आठवडय़ात अपेक्षित पसे हातात पडणार या कल्पनेने तुम्ही हुरळून जाल. व्यापार-उद्योगात बाजारपेठेतील आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नवीन जागा खरेदी कराविशी वाटेल. त्यातून चांगली कमाई होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला जादा अधिकार मिळाल्याने तुमच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारचा रुबाब दिसून येईल. घरामधल्या आवडत्या सदस्याच्या जीवनातील एखादा सुखद सोहळा ठरेल.

तूळ इतर वेळेला शांत असणारे तुम्ही या आठवडय़ात थोडेसे हट्टी बनाल. माझे तेच खरे असा एकंदरीत तुमचा बाणा राहील. मात्र कोणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घ्या. व्यापार-उद्योगात थोडय़ा कामामध्ये जास्त पसे मिळाल्यामुळे तुमच्या आशा पल्लवित होतील. नोकरीच्या ठिकाणी सगळ्यांशी सलोख्याने वागा. वरिष्ठांच्या सूचना विसरू नका. घरामध्ये प्रत्येक कामात आपले महत्त्व वाढावे अशा पद्धतीने नियोजन करा. तुमचे विचार इतरांवर लादल्यामुळे खटके उडतील.

वृश्चिक एखादी गोष्ट आपल्या पद्धतीने पार पडेल, असे गृहीत धरू नका. त्यासाठी पर्यायी मार्ग हातात ठेवा. व्यापार-उद्योगात बाजारातील चढउतारांकडे लक्ष द्या. मोठय़ा गुंतवणुकीमुळे हातात पडलेले पसे अपुरे वाटतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला अपेक्षित सुखसुविधा देऊन जास्त काम करून घेतील. हातातील अधिकारांचा योग्य कारणांकरिता वापर कराल. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये तुमचा पुढाकार असेल. पण तुम्हाला मात्र जया अंगी मोठेपण तया यातना कठीण याची आठवण येईल.

धनू या आठवडय़ामध्ये तुमच्या वागण्या-बोलण्यामधला विचित्रपणा इतरांना दिसून येईल. व्यापार-उद्योगात स्वत:चे विचार बाजूला ठेवा. गिऱ्हाईकांना महत्त्व दिले तर तुमचाच फायदा जास्त होईल. नोकरीच्या ठिकाणी आधी केले मग सांगितले असे धोरण ठेवा. बदली हवी असेल तर ताबडतोब प्रयत्न करा. घरामध्ये तुमचा प्रकार ‘दुसऱ्या सांगे तत्त्वज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण’ असा असणार आहे. त्याचे सगळ्यांना हसू येईल.

मकर काही वेळेला विचार करण्यापेक्षा कृतीला जास्त महत्त्व असते, या आठवडय़ात या गोष्टीकडे विशेष लक्ष द्याल. व्यापार-उद्योगात बाजारातील परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. त्याचा परामर्श घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय पक्के करू नका. हातातले पसे योग्य कारणाकरिता वापरा. नोकरीमध्ये संस्थेची गरज असल्यामुळे तुमच्या कामामध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये रुळायला थोडा वेळ लागेल. घरामध्ये एखाद्या किरकोळ कारणावरून तुम्ही इतरांवर राग काढाल. मुलांच्या उपद्व्यापाकडे लक्ष द्या.

कुंभ एखादे काम आपल्याला जमणारच नाही असे समजून आपण ते काम लांबवत असतो. आता तुमच्यामध्ये एक वेगळेच धारिष्टय़ निर्माण होईल. व्यापार-उद्योगात तुमच्या कंपनीची प्रतिष्ठा वाढविणारे काम तुम्हाला मिळेल. ते मिळविण्यासाठी कदाचित मध्यस्थांचा उपयोग करावा लागेल.  नोकरीच्या ठिकाणी बदली किंवा कामाच्या स्वरूपात बदल हवा असेल तर प्रयत्न सुरू करा. घरामध्ये तुमची बडदास्त ठेवली जाईल. त्याचा रुबाब तुमच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येईल.

मीन सहसा तुम्ही कोणाचे मन दुखावत नाही, पण या आठवडय़ामध्ये एखाद्या कारणाने तुमचा नाइलाज होईल.  व्यापार-उद्योगात नवीन वर्षांकरिता काही बेत आखून ठेवाल. त्या नादात रोजच्या गिऱ्हाईकांकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी जादा काम करावे लागेल. संस्थेकडून मिळणाऱ्या सवलतींचा तुम्ही गरफायदा घ्याल. घरामध्ये काही न टाळता येणारे खर्च तुमच्या वाटय़ाला येतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on November 24, 2017 1:01 am

Web Title: astrology from 24th to 30th november 2017