29 September 2020

News Flash

दि. ५ ते ११ मे २०१७

ग्रहमान परस्परविरोधी आहे. एखादे काम पूर्ण करण्याकरिता वाट वाकडी करावी लागेल.

राशिचक्र

मेष ग्रहमान परस्परविरोधी आहे. एखादे काम पूर्ण करण्याकरिता वाट वाकडी करावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत स्वत:चा धोका वाढवू नका. व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे. छोटय़ा प्रवासामुळे किंवा पूर्वी केलेल्या चांगल्या कामामुळे तुम्हाला नवीन काम मिळू शकेल. पशाची आवक वाढेल. नोकरीमध्ये कोणतेही काम कराल, त्याचा तुम्हाला उपयोग होईल. घरामध्ये किरकोळ कारणावरून इतरांशी वादविवाद होतील.

वृषभ काही महत्त्वाची कामे असतील तर ती शक्यतो आठवडय़ाच्या मध्यापर्यंत उरका. व्यापार-उद्योगात जे काम लांबले होते ते काम अचानक चांगली कलाटणी घेण्याची शक्यता आहे. आíथकदृष्टय़ा आठवडा जरी साधारण असला तरी एकंदरीत तुम्हाला तो लाभदायक ठरेल. नोकरीमध्ये किचकट कामामध्ये काहीतरी शक्कल लढवाल. त्यामुळे तुमच्या मनावरचे ओझे कमी होईल. वरिष्ठ मात्र एखादे नवीन काम तुमच्या मागे लावून देतील. घरामध्ये इतरांच्या कलाने तुम्ही वागलात तर सगळ्यांचा आनंद वाढवाल.

मिथुन एखादी अचाट अफाट कल्पना  साकार करण्याकरता तुम्ही तिचा सावलीप्रमाणे पाठलाग कराल. व्यवसाय-उद्योगात घाईघाईत गिऱ्हाईकांना शब्द देऊ नका. जे काम हातामध्ये घेतले आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण केलेत तर तुम्हाला चांगले पसे मिळतील. नोकरीमध्ये जास्त पसे आणि जास्त सवलती मिळविण्याकरता तुम्हाला भरपूर काम करावेसे वाटेल. घरामध्ये आवडत्या व्यक्ती तुमच्या अवतीभोवती असल्यामुळे तुमची कळी खुललेली असेल.

कर्क स्वस्थ आणि शांत बसणारी तुमची रास नाही. तुमच्या मनामध्ये काहीतरी खळबळ चालू असते. तशी ही या आठवडय़ात होईल. व्यवसाय किंवा उद्योगात फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता  वेगळ्या पद्धतीची अफलातून कल्पना तुमच्या मनात घर करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कल्पना सहकाऱ्यांना सांगू नका. नाहीतर त्यांना त्यांचा फायदा मिळेल. बेकार व्यक्तींना जी नोकरी मिळेल ती नोकरी स्वीकारून पुढे चालावे. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तींचे तुम्ही आदरातिथ्य करा.

सिंह कोणतेही वेडेवाकडे विचार मनात न आणता तुम्ही तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवलात तर या आठवडय़ात खूप काम करू शकाल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रामध्ये एखादे नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट अमलात आणून तुमचे काम वाढविण्याची तमन्ना पूर्ण कराल. परदेशात व्यवहार असणाऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता करावी. नोकरीमध्ये वरिष्ठ वेगवेगळ्या प्रकारची कामे तुमच्यावर सोपवतील.  घरामध्ये सगळ्यांना सढळ हाताने मदत कराल.

कन्या सभोवतालची परिस्थिती फारशी अनुकूल नसूनही तुम्ही मात्र बरेच उत्साही दिसाल. त्या उत्साहाच्या भरात एखादे अवघड काम हातात घ्याल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामाची पावती तुम्हाला गिऱ्हाइकांकडून मिळेल. प्रत्यक्ष पशाची आवक जरी वाढली नाही तरी ती सुधारण्याची खात्री वाटेल. नोकरीच्या ठिकाणी  कामाची दगदग वाढल्यामुळे मधूनच तुम्हाला शॉर्टकट घेण्याचा मोह होईल. बेकार व्यक्तींनी प्रयत्न वाढवावेत. घरामध्ये पडेल ते काम करण्याची तुमची तयारी असेल.

तूळ ग्रहमान उलटसुलट आहे. तुमच्या मनामध्ये विचारांची इतकी गर्दी झाली असेल की नेमके कशाला महत्त्व द्यावे, असा प्रश्न तुमच्यापुढे उभा राहील. एकावेळी एक काम केले तर हे कोडे सुटेल व्यापारउद्योगात तुम्ही तुमच्या पद्धतीने काम केले तर ते काम जास्त चांगल्या पद्धतीने पार पडेल. नोकरीमध्ये प्रत्येक काम स्वत: न करता हाताखालच्या व्यक्तींवर सोपवा. घरामध्ये एखादा सोहळा पार पडेल. पण तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे इतरांचा पाहुणचार करू शकणार नाही.

वृश्चिक तुम्ही प्रचंड काम करू शकता. कारण तुमच्यामध्ये न कळण्याइतकी मानसिक आणि शारिरिक शक्ती आहे. या आठवडय़ात या दोन्हींचा तुम्ही चांगला उपयोग केलात तर खूप काही करू शकाल. व्यापार-उद्योगात मूड बाजूला ठेवून गिऱ्हाइकांच्या शब्दाला मान द्या. नोकरीमध्ये सगळ्यांच्या गरजांनुसार तुम्हाला कामाच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागेल, त्याचे वाईट वाटून न घेता संस्थेच्या धोरणानुसार वागाल. घरामध्ये तुम्ही सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल.

धनू ग्रहमान परस्परविरोधी आहे. काहीतरी मिळविण्याकरिता काहीतरी गमवावे लागते याचा अनुभव येईल. व्यापार-उद्योगात थोडेसे धाडस करून मोठा हात मारावासा वाटेल. जुने सहकारी तुम्हाला मदत करतील. नवीन व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवू नका. नोकरीच्या ठिकाणी अवघड काम करावे लागेल. घरामध्ये एखादी नवीन कल्पना तुम्हाला इतरांना सुचवाविशी वाटेल. पण त्यामुळे तुमचे कष्ट वाढतील.

मकर ज्या कामात तुम्ही लक्ष घालाल ते काम उत्तम पद्धतीने पार पाडाल. ज्या कामात दुर्लक्ष होईल तेथे गोंधळ होईल. व्यापार-उद्योगात उत्तम नियोजन आणि योग्य वेळी केलेली कृती यामुळे तुम्हाला चांगले यश मिळेल. मात्र कोणताही निर्णय घाईगडबडीमध्ये घेऊ नका. नोकरीच्या कामात एखादी खूशखबर कळल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. वरिष्ठांना खूश करणाऱ्या कामाला तुम्ही जास्त प्राधान्य द्याल. घरामध्ये प्रिय व्यक्तीचे हट्ट पुरवावे लागतील. मुलांचे लाड जरूर करा, पण त्यांना डोक्यावर बसू देऊ नका.

कुंभ प्रत्येक वेळेला प्रत्येक माणूस फक्त व्यवहार पाळत नाही. कधीकधी भावनांनाही महत्त्व दिले जाते. या आठवडय़ात तुम्हाला भावनांचे जास्त महत्त्व वाटेल. व्यापार-उद्योगात ज्या गोष्टींना आज महत्त्व नाही, अशा कामामध्ये भरपूर वेळ जाईल. पण ही कामे तुम्ही शांततेने हाताळलीत तर त्याचा नंतर उपयोग होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे नेहमीचे काम करून एखादे वेगळे काम करावे लागेल. त्याचा अनुभव उपयोगी पडेल. घरामध्ये तात्त्विक मुद्दय़ांवरून इतरांशी मतभेद होतील.

मीन सहसा तुम्ही तुमचे विचार आणि निर्णय याविषयी घोषणा करत नाही. त्यात बदल कधीही होऊ शकतात. पण या आठवडय़ात जे तुम्ही बोलाल ते करून दाखवाल. व्यापार-उद्योगातील कामकाज चांगले होईल. गिऱ्हाइकांची ये-जा चांगली राहिल्याने तुमचा खिसा गरम राहील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. नोकरदार व्यक्तींनी एखादे काम पूर्ण होईपर्यंत घोषणा करू नये. घरामधला माहोल आनंदी आणि उत्साही राहील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 1:01 am

Web Title: astrology from 5th to 11th may 2017
Next Stories
1 दि. २८ एप्रिल ते ४ मे २०१७
2 दि. २१ ते २७ एप्रिल २०१७
3 दि. १४ ते २० एप्रिल २०१७
Just Now!
X